भारताचा दिग्गज क्रिकेटपटू परदेशात खेळण्यासाठी निवृत्ती घेणार?

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू परदेशात खेळण्यासाठी निवृत्ती घेणार?

इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग निवृत्ती जाहीर करू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करू शकतो. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी हरभजन निवृत्तीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्ये हरभजन सिंगच्या नावाचा समावेश आहे. पण लीगच्या नियमानुसार तिथे खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असणे आवश्यक आहे.

हरभजन सिंगने त्याचा अखेरचा सामना तीन वर्षांपूर्वी 2016 मध्ये आशिया कप स्पर्धेत खेळला होता. या लीगमध्ये हरभजनची बेस प्राइस जवळपास 88 लाख रुपये इतकी आहे. मात्र, बीसीसीआय़ने हरभजनच्या निवृत्तीची चर्चा फेटाळून लावली आहे. अद्याप लीग सुरू होण्यास वेळ आहे. त्यामुळे तो निवृत्ती घेऊन लीगमध्ये खेळेल असं म्हटलं जात आहे.

बीसीसीआय़च्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याशिवाय परवानगी मिळत नाही. भारताचा दिग्गज खेळाडू युवराज सिंगला यामुळेच निवृत्ती जाहीर करावी लागली. त्यानंतरच तो कॅनडा ग्लोबल टी20 लीगमध्ये खेळू शकला.

द हंड्रेड लीगसाठी 25 परदेशी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हरभजन सिंग एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी जुलै महिन्यात सुरू होईल. याची लिलाव प्रक्रिया 20 ऑक्टोंबरला लंडनमध्ये होणार आहे. सध्या हरभजनचे नाव ड्राफ्टमध्ये आहे. त्याची निवड झाल्यास पुढच्या निर्णयाबद्दल बीसीसीआयला सांगावे लागेल. स्पर्धेच्या नियमानुसार फक्त तीन परदेशी खेळाडू यात खेळू शकतात. हरभजनची निवड झाली तर तो निवृत्ती घेण्याची शक्यता नाकारण्यात येणार नाही.

हरभजन सिंगने 103 कसोटीमध्ये 417 गडी बाद केले आहेत. कसोटीत भारताचा तो यशस्वी गोलंदाज आहे. भारताकडून सर्वाधिक 619 गडी बाद करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याच्यानंतर कपिल देव 434 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हरभजनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 236 सामन्यात 269 गडी बादे केले आहेत. तर 28 टी20 सामन्यात त्याने 25 गडी बाद केले आहेत.

VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

Published by: Suraj Yadav
First published: October 4, 2019, 11:28 AM IST

ताज्या बातम्या