S M L

भारत-पाक मॅचवर पुन्हा एकदा 'मौका-मौका'

4 जूनलादेखील चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 'मौका-मौका' वाला व्हिडिओ तयार करण्यात आलाय

Sachin Salve | Updated On: May 30, 2017 09:28 PM IST

भारत-पाक मॅचवर पुन्हा एकदा 'मौका-मौका'

30 मे : भारत आणि पाकिस्तानची मॅच असली की क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहाला उधाणच येतं. कारण या दोघांमध्ये होणारे सामने नेहमीच अंगावर रोमांच उभे करतात. असं असलं तरीही वर्ल्ड कपमध्ये मात्र भारताने नेहमीच पाकला धूळ चारलीय. यातच 2015 च्या वर्ल्ड कप वेळी स्टार स्पोर्ट्स कडून एक अॅड कँपेन चालवलं गेलं होतं. ज्यामध्ये पाकच्या चाहत्यांची असलेली विजयाची आशा आणि त्या आशेला सुरूंग लावणारे भारतीय चाहते दाखवण्यात आले होते. त्यावेळी या अॅड्स प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या. सोशल मिडियावरही याबाबतच्या विनोदांनी धुमाकूळ घातला होता.

4 जूनलादेखील चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 'मौका-मौका' वाला व्हिडिओ तयार करण्यात आलाय. ज्यामध्ये शेवटचं वाक्य फारच उपरोधिक आहे,ज्यात म्हटलंय की, 'क्रिकेट ही अशी एकच जागा आहे, जिथे पाकिस्तानला हरवल्याचा पुरावा द्यावा लागत नाही.'

म्हणूनच तुम्हालाही हा विनोदी आणि उपरोधिक व्हिडिओ पहायला नक्कीच आवडेल.व्ही सेव्हन पिक्चर्सने युट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 21 लाखांहून अधिक लोकांनी बघितलाय.

(courtesy by V Seven Pictures)

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2017 09:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close