Home /News /sport /

...तर ऑस्ट्रलियावर येऊ शकते 'हमारी बिल्ली हमसेही म्याव' म्हणण्याची वेळ

...तर ऑस्ट्रलियावर येऊ शकते 'हमारी बिल्ली हमसेही म्याव' म्हणण्याची वेळ

Matthew Hayden

Matthew Hayden

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानची लढत ऑस्ट्रेलियाशी (Pakistan vs Australia) होणार आहे.

  नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्या सेमी फायनलमध्ये रोमांचक सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडला पराभूत करत फायनलमधील आपले स्थान पक्के केले. या सामन्यानंतर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये आता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs PAK) आमने सामने असतील. आपली विजयी घोडदौड कायम ठेवत दोन्ही संघानी सेमीफायनमध्ये मजल मारली आहे. या दोन्हीमध्ये कोणता संघ फायलमध्ये पोहचतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशातच, क्रिकेट जगतात एक वेगळीच शंका उपस्थित करण्यात येत आहे. 'हमारी बिल्ली हमसेही म्याव' अशी म्हणण्याची वेळ कदाचित ऑस्ट्रेलियावर (AUS) येऊ शकते. असे म्हणण्याचे कारणही तसेच आहे. पाकिस्तानकडे ऑस्ट्रेलियन संघाचे 'गुप्त' सांगणारी व्यक्ती आहे. हा दुसरा कोणी नसून मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) हा फलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलियासाठी १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. T20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून त्याला नेमण्यात आले आहे. बाबर आझमच्या पाकिस्तान संघात काम करण्यासाठी हेडनला फारसा वेळ मिळाला नाही. कारण त्याचा थेट दुबईतील संघाशी संबंध होता. असे असतानाही हेडनच्या पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये उपस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. काही दिवसांतच हेडनने पाकिस्तान संघात कायापालट केला. कारण, अनपेक्षित कामगिरी पाकिस्तानचा संघ करताना दिसत आहे. अनेकवेळा शंका उपस्थित केलेला संघच चॅम्पियन म्हणून उदयास येत आहे.

  हेडनचा अनुभव पाकिस्तानसाठी कामी आला

  या सामन्यात पाकिस्तानचा संघ जुने रेकॉर्ड विसरून मैदानात उतरला आणि खेळाच्या प्रत्येक विभागात टीम इंडियावर वर्चस्व गाजवताना दिसले आहे. त्यामुळे यातील हेडनच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण हेडन हा मोठ्या स्पर्धेचा खेळाडूही राहिला आहे. भारताविरुद्ध त्याचा अतुलनीय विक्रम आहे. 2000-2001 मधील ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा याचा पुरावा आहे. त्यानंतर हेडनने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 549 धावा केल्या होत्या. जो एक विक्रम आहे. त्याला भारतीय क्रिकेट चांगलेच माहीत आहे. अशा परिस्थितीत हेडनच्या अनुभवाचा पाकिस्तान संघाला फायदा झाला.

  हेडनला ऑस्ट्रेलिया संघाचे सखोल ज्ञान

  आता हेडन ऑस्ट्रेलियाविरुद्धही पाकिस्तानला विजयाचा गुरुमंत्र देत आहे. हेडनने या सामन्यापूर्वी असेही म्हटले होते की, मी दोन दशकांहून अधिक काळ ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा योद्धा आहे, त्यामुळे मला केवळ या खेळाडूंचीच नाही तर ऑस्ट्रेलियाची क्रिकेट संस्कृतीही चांगली समजते. त्याच्या या समजुतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाचा मार्ग सुखकर होणार असल्याचा अंदाज क्रिकेट जगतात वर्तवण्यात येत आहे.

  हेडनला वॉर्नर आणि फिंचची ताकद आणि कमकुवतपणा माहीत आहे

  50 वर्षीय हेडन ऑस्ट्रेलियाकडून 15 वर्षे क्रिकेट खेळला आहे. प्रशिक्षक म्हणून त्याची ही पहिलीच मोठी कसोटी आहे. पण त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेटची सखोल ज्ञान आहे. त्याला कांगारू खेळाडूंची मानसिकता समजते. अॅरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांची फलंदाजी त्याने जवळून पाहिली आहे. या खेळाडूंची ताकद आणि कमकुवतपणा हेडनला माहीत आहे. या स्पर्धेतील हे तीन खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे सर्वात महत्त्वाचे ठरले आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत 640 धावा केल्या आहेत. यामध्ये या तीन आघाडीच्या फलंदाजांच्या बॅटमधून 402 धावा झाल्या आहेत. अशा स्थितीत हेडन वॉर्नरला फिंच आणि मार्शची चावी सापडली असती.

  हेडन स्वतः विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता

  2003 आणि 2007 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा हेडन सदस्य होता. त्याला मोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे. सध्याच्या पाकिस्तान संघातील फार कमी खेळाडूंनी आयसीसी स्पर्धेची उपांत्य फेरी खेळली आहे. अशा परिस्थितीत हेडनचे अनेक अनुभव पाकिस्तानच्या युवा संघासाठी फायद्याचे ठरणार आहेत. जसे त्याने भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात केले होते.

  ऑस्टेलियन गोलंदाजांच्या खेळीचा सखोल अभ्यास

  ऑस्ट्रेलियन संघाची क्रिकेट खेळण्याची शैली अगदी स्पष्ट आहे. तो विरोधी गोलंदाज आणि फलंदाजांवर वर्चस्व गाजवतो. स्लेजिंगची कोणतीही संधी सोडात नाहीत. जर फलंदाज फॉर्ममध्ये असेल तर त्याला उतरवण्याचे त्याचे सर्वात मोठे हत्यार म्हणजे स्लेजिंग. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे देखील यावेळी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्याविरुद्ध स्लेजिंगचा वापर करू शकतात. त्याचा वापर हेडननेही आपल्या कारकिर्दीत केला आहे. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियन संघाच्या या खेळीला सामोरे जाण्यासाठी तो बाबर आणि रिजवानसाठी उपयुक्त ठरेल.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Australia, Pakistan, T20 cricket, T20 league, T20 world cup

  पुढील बातम्या