मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: 11 महिन्यात एकदाच झाला आऊट, कॅन्सरलाही हरवणारा हा आहे टी20तला सध्याचा बेस्ट फिनिशर

Ind vs Aus: 11 महिन्यात एकदाच झाला आऊट, कॅन्सरलाही हरवणारा हा आहे टी20तला सध्याचा बेस्ट फिनिशर

मॅथ्यू वेड

मॅथ्यू वेड

Ind vs Aus: गेल्या वर्षभरात एक बॅट्समन टी20 क्रिकेटमध्ये असाच जास्त स्ट्राईक रेटनं धावांचा रतीब घालतोय. महत्वाची बाब ही की तो टी20तला सध्याच्या घडीचा सर्वोत्तम मॅच फिनिशर म्हणून ओळखला जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 25 सप्टेंबर: टी20 क्रिकेट हा असा गेम आहे जिथे कोणत्याही बॅट्समनला अगदी पहिल्या बॉलपासून प्रहार करण्याचं लायसन्स मिळालेलं असतं. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये बॅट्समननं किती रन्स केले यापेक्षा ते किती बॉलमध्ये केले हे पाहिलं जातं. कमी बॉलमध्ये अर्थात जास्त स्ट्राईक रेटनं रन्स करणारा बॅट्समन या फॉरमॅटमध्ये राजा समजला जातो. गेल्या वर्षभरात एक बॅट्समन टी20 क्रिकेटमध्ये असाच जास्त स्ट्राईक रेटनं धावांचा रतीब घालतोय. महत्वाची बाब ही की तो टी20तला सध्याच्या घडीचा सर्वोत्तम मॅच फिनिशर म्हणून ओळखला जात आहे. त्याचं नाव आहे ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर बॅट्समन मॅथ्यू वेड.

वर्ल्ड कपपासून सुपर फॉर्म कायम

गेल्या वर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये वेड वेड्यासारखा खेळला. तेव्हापासून त्याचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधला फॉर्म अद्याप कायम आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी20त वेडनं 215 च्या स्ट्राईक रेटनं रन्स केले आहेत आणि दोन्ही वेळा तो नॉट आऊट राहिला आहे. हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. वेड एकदा क्रीझवर सेट झाला तर त्याला आऊट करणं मुश्किल आहे. तो मधल्या फळीत सर्वात शेवटी बॅटिंगला येतो आणि वेगानं रन्स करण्यावर त्याचा भर असतो.

हेही वाचा - Ajinkya Rahane: भर मैदानात रहाणेचं रौद्र रुप... ‘या’ युवा खेळाडूला रहाणेनं दाखवला बाहेरचा रस्ता, Video व्हायरल

11 महिन्यात एकदाच आऊट

गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलच्या सामन्यानंतर वेड आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकदाच आऊट झाला आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात 41 रन्सची इनिंग केली होती ज्यामुळे ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहोचली होती. त्यानंतर फायनलनध्ये ऑस्ट्रेलियानं न्यूजीलंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हापासून वेडनं 7 इनिंग खेळल्या आहेत. त्यात तो 6 वेळा नाबाद राहिलाय. या 7 इनिंगमध्ये त्यानं 187 रन्स फटकावले आहेत. त्यात त्याचा स्ट्राईक रेट आहे 170. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्येही वेड ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा शिलेदार असणार आहे.

हेही वाचा - MS Dhoni: रिटायरमेंट नाही तर धोनीनं केलं एका प्रॉडक्टचं रिलॉन्चिंग, पण का? पाहा Video

16व्या वर्षी कॅन्सर

याच मॅथ्यू वेडनं लहान वयात वर्षी कॅन्सरसारख्या आजारावरही मात केली होती. त्याला 16व्या वर्षी टेस्टिक्युलर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यानं उपचार घेतले आणि 19 व्या वर्षापर्यंत तो बराही झाला. त्यानंतर त्यानं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यासाठी तो होबार्टमधून मेलबर्नला स्थायिक झाला. आणि त्यानंतर त्यानं ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात आपली जागाही पक्की केली. आणि आज तो ऑस्ट्रेलियाचा एक ग्रेट फिनिशर म्हणून ओळखला जातो.

First published:

Tags: Cricket news, India vs Australia, Sports