S M L

धोणींचा विनिंग चौकार, पुण्याचा हैदराबादवर विजय

177 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे सुपरजायंटने 4 विकेट वर 179 रन्स करून विजय मिळवला

Sachin Salve | Updated On: Apr 22, 2017 10:49 PM IST

धोणींचा विनिंग चौकार, पुण्याचा हैदराबादवर विजय

22 एप्रिल : महेंद्र सिंग धोणीच्या तडाखेबाज बॅटिंगच्या बळावर रायझिंग पुणे सुपरजायंटने सनराइजर्स हैदराबादला 6 गडी राखून पराभूत केलं.

हैदराबादने पहिली बॅटिंग करत 176 रन्सचा टप्पा गाठला. 177 धावांचं टार्गेट दिलं. हैदराबादकडून मोईजेज ओनरीकेजने नाबाद 55 रन्सची खेळी केली. 28 बाॅल्समध्ये 6 चौकार आणि 2 सिक्स लगावले. तर डेव्हिड वाॅर्नरने 40 बाॅल्समध्ये 3 चौकार आणि 1 सिक्स लगावत 43 रन्स ठोकले. तर शिखर धवनने 30 रन्स केले.

177 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे सुपरजायंटने 4 विकेट वर 179 रन्स करून विजय मिळवला.  16.1 ओव्हरपर्यंत पुण्याचे 4 गडी बाद झाले होते. मनोज तिवारीने धोणीला साथ देत विजयाचा पाया भरला. विजय तिवारीने 8 बाॅल्समध्ये 3 चौकार लगावत महत्वपूर्ण 17 रन्स केले. अखेरच्या ओव्हरमध्ये 1 बाॅलमध्ये 2 रन्सची गरज असताना धोणींनी विनिंग चौकार लगावत टीमला विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 09:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close