मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

FIFA WC 2022: रेफ्रीच बनला 'मॅन ऑफ द मॅच!' पाहा फिफा वर्ल्ड कप सामन्यात कशी जिंकली ऑस्ट्रेलिया?

FIFA WC 2022: रेफ्रीच बनला 'मॅन ऑफ द मॅच!' पाहा फिफा वर्ल्ड कप सामन्यात कशी जिंकली ऑस्ट्रेलिया?

रेफ्रीनं ऑस्ट्रेलियाला जिंकून दिलं?

रेफ्रीनं ऑस्ट्रेलियाला जिंकून दिलं?

FIFA WC 2022: ऑस्ट्रेलियन टीमनं ट्युनिशियाविरुद्धची लढत 1-0 अशा फरकानं जिंकली. या वर्ल्ड कपमधला ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय ठरला. पण याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी मैदानातल्या 11 खेळाडूंव्यतिरीक्त आणखी एका व्यक्तीची मदत झाली.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

दोहा-कतार, 26 नोव्हेंबर: फिफा वर्ल्ड कपमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात फ्रान्सकडून हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमनं ट्युनिशियाविरुद्धची लढत 1-0 अशा फरकानं जिंकली. या वर्ल्ड कपमधला ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय ठरला. पण याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी मैदानातल्या 11 खेळाडूंव्यतिरीक्त आणखी एका व्यक्तीची मदत झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ड्यूकनं विजयी गोल केला पण त्यासाठी त्याला साथ लाभली ती रेफरी डॅनिएल सीबर्ट यांची.

ऑस्ट्रेलियाच्या विजयात रेफ्रीची साथ

मॅचच्या 23 व्या मिनिटाला रेफ्रीनं चुकीनं ट्युनिशियाचा खेळाडू एलिस सखीरीला चुकून पाडलं. यावेळी रेफ्री सीबर्ट यांनी फाऊल न देता मॅच सुरुच ठेवली आणि ऑस्ट्रेलियाला आक्रमण करम्याची संधी याची. याच संधीचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ड्यूकनं शानदार गोल केला.

हेही वाचा - FIFA WC 2022: अर्जेन्टिना-मेक्सिको वर्ल्ड कप सामन्याआधी कतारमध्ये उसळला आगडोंब, पाहा काय घडलं?

ड्यूकचा दमदार हेडर

रेफ्रीच्या धक्क्यानं ड्यूक सखीरी जेव्हा मैदानात पडला तेव्हा ड्यूक त्याच्या नेमका मागे होता. ड्यूकनं त्या संधीचा फायदा घेतला आणि कोणत्याही चॅलेंजशिवाय तो ट्युनिशियाच्या बॉक्समध्ये पोहोचला. त्यानंतर ट्युनिशियन डिफेंडरचा अयशस्वी फटका डाव्या बाजूनं हेडरवर थेट गोलपोस्टमध्ये धाडला. या विजयासह ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या नंबरवर पोहोचली आहे. या गटात फ्रान्स आणि डेन्मार्क हे इतर संघ आहेत.

First published:

Tags: FIFA, FIFA World Cup, Football