दिल्ली जिंकली, गुजरात लायन्सला दाखवला बाहेरचा रस्ता

दिल्ली जिंकली, गुजरात लायन्सला दाखवला बाहेरचा रस्ता

दिल्लीने जशाच तसे उत्तर देत 214 धावांचा डोंगर उभा करत मॅच खिश्यात घातली

  • Share this:

05 मे : धावांचा डोंगर उभा असुनन सुद्धा दिल्ली डेअरडेव्हिल्सने गुजरात लायन्सचा धुव्वा उडवत 7 विकेट्सने विजय मिळवलाय.

गुजरात लायन्सने पहिली बॅटिंग करत दिल्लीला 208 रन्सचं टार्गेट दिलं होतं. पण दिल्लीने जशाच तसे उत्तर देत 214 धावांचा डोंगर उभा करत मॅच खिश्यात घातली.  आयपीएलच्या इतिहासात हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. याआधी राजस्थान राॅयल्सने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध 214 धावांच्या डोंगर सर केला होता.

दिल्लीच्या या विजयाचे रिषभ पंत आणि संजू सॅमसन हिरो ठरले. रिषभने 43 बाॅल्समध्ये 97 रन्स केले तर सॅमसनने 31 बाॅल्समध्ये 61 रन्स केले. या विजयासह दिल्लीने प्लेआॅफमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळा केलाय. तर दुसरीकडे गुजरात बाहेर गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 12:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...