मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BCCI Domestic: बीसीसीआयला डोमेस्टिक सामन्यांसाठी मिळाला नवा स्पॉन्सर, घेणार पेटीएमची जागा

BCCI Domestic: बीसीसीआयला डोमेस्टिक सामन्यांसाठी मिळाला नवा स्पॉन्सर, घेणार पेटीएमची जागा

Sourav Ganguly BCCI

Sourav Ganguly BCCI

BCCI Domestic: 8 सप्टेंबरपासून बीसीसीआयचा डोमेस्टिक क्रिकेट सीझन सुरु होतोय. दुलीप ट्रॉफी ही यंदाच्या मोसमातली पहिली स्पर्धा असेल. पण त्याआधी बीसीसीआयला यंदाच्या डोमेस्टिक सीझनसाठी नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 5 सप्टेंबर: 

येत्या 8 सप्टेंबरपासून बीसीसीआयचा डोमेस्टिक क्रिकेट सीझन सुरु होतोय. दुलीप ट्रॉफी ही यंदाच्या मोसमातली पहिली स्पर्धा असेल. पण त्याआधी बीसीसीआयला यंदाच्या डोमेस्टिक सीझनसाठी नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. पेटीएमऐवजी आता मास्टरकार्ड भारतात होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिटेट स्पर्धांसाठी मुख्य प्रायोजक असेल. बीसीसीआयनं नुकतीच स्पॉन्सरशिपच्या हस्तांतरणाबाबत पेटीएमशी विस्तृत चर्चा केली. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार भारतातील महिला आणि पुरुषांचे सर्व आंतरराष्ट्रीय सामने, ईराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि ज्युनियर क्रिकेट यांसारख्या स्पर्धांमध्ये मास्टरकार्ड टायटल स्पॉन्सर असेल. 2022-23 या मोसमात भारतात तब्बल 1500 सामने खेळवण्यात येणार आहेत.

डोमेस्टिक सीझन महत्वाचा - गांगुली

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींच्या मते आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनाबरोबरच देशांतर्गत क्रिकेटही तितकच महत्वाचं आहे. कारण यातूनच भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी टीम बनते. तर जय शाह म्हणाले की सध्या आपण एका भारतीय क्रिकेटच्या एका महत्वाच्या टप्प्यात आहोत. टी20 विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ भारतात येणार आहेत. त्यानंतर श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका आणि पुढच्या वर्षी सुरुवातीलाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असा भरगच्च कार्यक्रम आगामी काळात आहे.

हेही वाचा - Asia Cup 2022: अश्विन, अक्षर, कार्तिकपैकी कुणाला संधी? कशी असेल श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI?

कोरोनानंतर भारतीय क्रिकेट पूर्वपदावर

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे भारतीय क्रिकेटवर मोठा परिणाम झाला होता. देशांतर्गत होणाऱ्या बीसीसीआयच्या अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. पण यंदा मात्र सप्टेंबर महिन्यापासूनच बीसीसीआयनं भरगच्च कार्यक्रम आखला आहे. त्यात पुढच्या वर्षी वन डे विश्वचषकाच्या आयोजनाची जबाबदारीही भारताकडे असेल.

First published:

Tags: BCCI, Sports