विराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन

युझवेंद्र चहलने कर्णधार विराट कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत 6 गडी बाद केले.

News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2019 08:17 AM IST

विराटच्या या 'ट्रम्प कार्ड'चं मास्टर ब्लास्टरनेही केलं कौतुक, वाचा काय म्हणाला सचिन

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा आणि निर्णायक सामना जिंकून भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. या सामन्यात भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने 6 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला 230 धावांत रोखले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सामना जिंकला.

शेवटच्या सामन्यात दिलेल्या संधीचे सोने करत युझवेंद्र चहलने अवघ्या 42 धावांमध्ये 6 गडी बाद केले. आपल्या कामगिरीने त्याने कर्णधार विराट कोहलीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.

या सामन्यात भारताने आपल्या संघात तीन बदल केले होते. कर्णधार विराट कोहलीने सर्वांनाच चकीत करत कुलदीप यादवला प्लेईंग इलेवनमधून बाहेर काढले आणि त्याच्या जागी 'ट्रंप कार्ड' म्हणजेच युझवेंद्र चहलला संघात घेतले.

Loading...

विराटच्या या ट्रम्प कार्डचे कौतुक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही केले आहे. युझवेंद्रने फलंदाजांना आपल्याला हवं तसं खेळायला भाग पाडलं अशा शब्दांत सचिनने त्याच्या गोलंदाजीचं वर्णन केलं.

ऑस्ट्रेलियाचा पाचव्या गडीही चहलनेच बाद केला. चहलच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने स्टोइनिसचा झेल पकडत त्याला बाद केले.

विराट कोहलीच्या या निर्णयानं प्रतिस्पर्धी संघाला कोड्यात टाकलं. कोहलीच्या या खेळाडूनं त्याच्या पहिल्याच षटकातील चार चेंडूत सामन्याचा नूर पालटला.

कोहलीच्या या निर्णयानं प्रतिस्पर्धी संघाला कोड्यात टाकलं. कोहलीच्या या खेळाडूनं त्याच्या पहिल्याच षटकातील चार चेंडूत सामन्याचा नूर पालटला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक अशा सामन्यात विराट कोहलीने कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहलला घेतलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक अशा सामन्यात विराट कोहलीने कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहलला घेतले.

फिरकीपटू असलेल्या चहलने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये चार चेंडूतच ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. चहलचा दुसरा चेंडू न समजल्याने शॉन मार्श बाद झाला. त्याने 54 चेंडूत 39 धावा केल्या.

फिरकीपटू असलेल्या चहलने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये चार चेंडूतच ऑस्ट्रेलियाला धक्का दिला.
चहलचा दुसरा चेंडू न समजल्याने शॉन मार्श बाद झाला. त्याने 54 चेंडूत 39 धावा केल्या.

मार्शला बाद केल्यानंतर याच ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर ख्वाजाला बाद केले. त्यानं स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेत ख्वाजाला 34 धावांवर बाद केलं.

युजवेंद्र चहलची ही ओव्हर सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली.

ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या दोन विकेट लवकर गमावल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी मार्श आणि ख्वाजाने 73 धावांची भागीदारी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 08:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...