पंचांच्या चुकीमुळे मेरी कोमचं 'सुवर्ण'स्वप्न भंगलं, भारताने केली तक्रार

पंचांच्या चुकीमुळे मेरी कोमचं 'सुवर्ण'स्वप्न भंगलं, भारताने केली तक्रार

भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोमचं वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्यांदा सुवर्णपदक पटकावण्याचं स्वप्न भंगलं. तिला बुसेन्झ कैरोग्लुनेनं पराभूत केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोमला सातव्यांदा जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याचं स्वप्न भंगलं आहे. टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने हीनं मेरी कोमला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात मेरी कोमनं कोलंबियाच्या व्हिक्टोरिया वेलेन्सियाविरुद्ध विजय मिळवला होता. सहावेळा विश्वविजेत्या मेरी कोमच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, उपांत्य फेरीत पराभवामुळे तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मेरी कोमला कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे.

मेरी कोमनं पहिल्या दोन राऊंडमध्ये चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर नियंत्रण राखता आलं नाही. टर्कीच्या बुसेन्सनं आक्रमक खेळ सुरू केला. पहिल्या दोन राऊंडमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली. मात्र, शेवटच्या काही मिनिटांत बुसेन्सनं आघाडी घेत मोरी कोमवर हल्लाबोल केला. शेवटी बुसेन्सला 1-4 अशा फरकाने विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, भारताने मॅच रेफरींच्या निर्णयावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे.

भारताच्या तीन बॉक्सर अद्याप पदाच्या शर्यतीत आहेत. यामध्ये मंजू राणी, जमुना बोरो आणि लव्हलिना बोर्गोहेन यांचा समावेश आहे.

वर्ल्ड़ चॅम्पिय़नशिपमध्ये मेरी कोमनं आतापर्यंत सहा सुवर्णपदकं पटकावली आहेत. याशिवाय एक रौप्यपदकही तिच्या नावावर होतं. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने 7 पदकं पटकावली होती.

कांस्यपदकासह वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिच्या खात्यात 8 पदकं जमा झाली आहेत. पुरुष आणि महिला दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदकं मेरी कोमच्या नावावर आहेत. तिनं पुरुष बॉक्सर फेलिक्स सेवॉनला मागे टाकलं आहे. त्याच्या नावावर 7 पदकं होती. सेवॉन आणि मेरी कॉम यांच्या नावावर सर्वाधिक सुवर्णपदकं पटकावण्याचा विक्रम आहे. दोघांनीही 6 सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. मेरी कोमनं याशिवाय एक कांस्यपदक पटकावलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या केटी टेलरनं 6 पदकं पटकावली असून त्यात 5 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक आहे.

वाचा : 'पांड्या मी नेहमी तुझ्यासोबत', वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री झाली भावूक

वाचा : क्रिकेट वाचवण्यासाठी अखेर ‘देव’ आला धावून, युवा खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

First published: October 12, 2019, 12:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading