नवी दिल्ली, 21 मार्च : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 14 दिवस क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. मात्र भारताची स्टार बॉक्सर आणि राज्यसभेची खासदार मेरी कोम हिनं हा प्रोटोकॉल मोडला आहे.
जॉर्डन येथे झालेल्या आशिया-ओशिनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेऊन 13 मार्च रोजी मेरी कोम रोजी मायदेशी परतली होती. त्यानंतर कोरोनामुळे 14 दिवस घरी राहणार असल्याचे मेरीने सांगितले होते. याबाबत तिनं एक ट्वीटही केले होते. मात्र 18 मार्च रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रापती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित होती. 14 दिवस क्वारंटाईन पूर्ण न केल्याने मेरी कोमनं हा प्रोटोकॉल मोडला आहे.
वाचा-ट्रेनमधून प्रवास करत होती रवीना टंडन, Coronavirus च्या भीतीनं साफ केली पूर्ण सीट
राष्ट्रपतींनी अधिकृत ट्विटर हँडलने या कार्यक्रमाचे फोटो अपलोड केले. यात इतर सदस्यांसोबत मेरी दिसत आहे. दरम्यान यावेळी कोरोना पॉझिटिव्ह बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेले भाजपचे खासदार दुष्यंत सिंगही राष्ट्रपती भवनात उपसथित होते. सिंह आता सेल्फ क्वारेन्टाईनमध्ये आहेत.
वाचा-क्रिकेटविश्वात घुसला व्हायरस, भारताविरुद्ध खेळलेल्या 'या' गोलंदाजाला कोरोना
President Kovind hosted Members of Parliament from Uttar Pradesh and Rajasthan for breakfast at Rashtrapati Bhavan this morning. pic.twitter.com/Rou6GLrSHH
— President of India (@rashtrapatibhvn) March 18, 2020
वाचा-कोरोनाने हिरावलं तान्ह्या बाळावरचं छत्र, जन्मानंतर काही दिवसांतच आईचा मृत्यू
दरम्यान, मेरी कॉमने प्रोटोकॉल तोडल्याचे मान्य केले आहे. मेरीने जारी केलेल्या निवेदनात, "मी जॉर्डनहून परत आल्यापासून मी घरी आहे. फक्त राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात गेले होते. मात्र मी दुष्यंत सिंह यांना भेटले नाही किंवा हातही मिळवला नाही. सध्या मी क्वारंटाईनमध्येच आहे, आणि पुढचे काही दिवस घरीच थांबणार आहे", असे म्हटले आहे. भारतात परतल्यानंतर मेरीने क्वारंटाईनमध्ये राहण्याचे फायदेही सांगितले होते. मात्र तिनेच प्रोटोकॉल मोडल्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर टीका केली आहे.