मेरी कोमच्या 'पंच'ने केली निखत झरीनची बोलती बंद, ऑलिम्पिक पात्रता फेरीत मिळवली जागा

मेरी कोमच्या 'पंच'ने केली निखत झरीनची बोलती बंद, ऑलिम्पिक पात्रता फेरीत मिळवली जागा

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या वादानंतर आज बहुचर्चित असा निखत झरीनविरुद्ध मेरी कोम हा सामना पार पडला. या सामन्यात सहावेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मेरी कोमनं निखतचा पराभव करत ऑलिम्पिक पात्रता फेरीत जागा मिळवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या वादानंतर आज बहुचर्चित असा निखत झरीनविरुद्ध मेरी कोम हा सामना पार पडला. या सामन्यात सहावेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मेरी कोमनं निखतचा पराभव करत ऑलिम्पिक पात्रता फेरीत जागा मिळवली आहे.

महिलांच्या 51 किलो गटाच्या चाचणीत माजी ज्युनियर जागतिक विजेत्या झरीनने राष्ट्रीय विजेत्या ज्योती गुलियाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर, मेरी कोमने रितू ग्रेवालला पराभूत केले. शनिवारी मेरी कोम-झरीन यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत 9-1नं मेरी कोममं विजय मिळवला. त्यामुळं मेरी कोम पुढच्या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या पात्रता स्पर्धेत भाग घेऊ शकते.

दरम्यान, या स्पर्धेसाठी संघ निवडताना माझी मेरी कोमशी चाचणी लढत खेळवावी, अशी मागणी स्वत: निखतने केली होती. त्यासाठी निखतनं क्रीडामत्र्यांना पत्रही लिहिले होते. मात्र मेरीनं झरीनची बोलती बंद करत ऑलिम्पिक पात्रता फेरीत जागा मिळवली आहे.

First published: December 28, 2019, 1:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading