• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • वेस्ट इंडिजला 2 T20 World Cup जिंकवून देणारा मार्लोन सॅम्युअल्स भ्रष्टाचारात अडकला, ICC ची नोटीस

वेस्ट इंडिजला 2 T20 World Cup जिंकवून देणारा मार्लोन सॅम्युअल्स भ्रष्टाचारात अडकला, ICC ची नोटीस

फोटो सौजन्य : आयसीसी

फोटो सौजन्य : आयसीसी

वेस्ट इंडिजचा माजी ऑलराऊंडर मार्लोन सॅम्युअल्स (Marlon Samuels) भ्रष्टाचार प्रकरणात अडकला आहे. आयसीसीच्या एण्टी करप्शन युनिटने (ICC Anti-Corruption Code) सॅम्युअल्स चार प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचं सांगितलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : वेस्ट इंडिजचा माजी ऑलराऊंडर मार्लोन सॅम्युअल्स (Marlon Samuels) भ्रष्टाचार प्रकरणात अडकला आहे. आयसीसीच्या एण्टी करप्शन युनिटने (ICC Anti-Corruption Code) सॅम्युअल्स चार प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचं सांगितलं आहे. याबाबत त्याला आयसीसीने नोटीसही पाठवली आहे. रिपोर्टनुसार सॅम्युअल्सने टी-10 लीगमध्ये भ्रष्टाचारविरोधी नियम मोडले. सॅम्युअल्सला आयसीसीने नोटीस पाठवत 14 दिवसांमध्ये उत्तर द्यायला सांगितलं आहे. सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजला 2012 आणि 2016 सालचे टी-20 वर्ल्ड कप जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली. दोन्ही फायनलमध्ये सॅम्युअल्सने सर्वाधिक रन केले होते. आयसीसीकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रियेनुसार सॅम्युअल्सने नियम 2.4.2 चं उल्लंघन केलं आहे. यानुसार सॅम्युअल्स एण्टी करप्शन अधिकाऱ्यांना त्याला टी-10 लीगदरम्यान मिळालेल्या गिफ्टबाबत योग्य माहिती देऊ शकला नाही. एवढच नाही तर त्याच्यावर चौकशीमध्ये सहयोग न केल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. IPL 2021 : दीपक हुड्डा अडचणीत, BCCI ची भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी 2012 आणि 2016 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सॅम्युअल्सने अर्धशतकं केली, ज्यामुळे वेस्ट इंडिजचा विजय झाला. 2012 साली श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये त्याने 56 बॉलमध्ये 78 रन केले, या सामन्यात वेस्ट इंडिजचा 36 रनने विजय झाला. यानंतर 2016 सालच्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने 66 बॉलमध्ये नाबाद 85 रनची खेळी केली. सॅम्युअल्सच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिज दुसऱ्यांदा टी-20 चॅम्पियन झाली. मार्लोन सॅम्युअल्सने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी 71 टेस्टमध्ये 3,917 रन केले, ज्यात 7 शतकं आणि एका द्विशतकाचा समावेश आहे. सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी 207 वनडेमध्ये 32.98 च्या सरासरीने 5,606 रन केले आणि 10 शतकं लगावली. 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सॅम्युअल्सला 1,611 रन करता आले.
  Published by:Shreyas
  First published: