Home /News /sport /

IPL 2021: ऋतुराजच्या फोटोवर मराठी अभिनेत्री क्लीन बोल्ड

IPL 2021: ऋतुराजच्या फोटोवर मराठी अभिनेत्री क्लीन बोल्ड

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यानं आयपीएल मॅचच्या दरम्यानचा एक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलाय. तो फोटो पाहून सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी अभिनेत्री क्लीन बोल्ड झाली आहे.

    मुंबई, 30 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सची (CSK) या स्पर्धेतील वाटचाल सध्या जोरदार सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध झालेल्या  पहिल्या पराभवानंतर चेन्नईनं सलग पाच विजय मिळवले आहेत. चेन्नईनं मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 7 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार पुणेकर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) होता. ऋतुराजनं एक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलाय. तो फोटो पाहून सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी अभिनेत्री क्लीन बोल्ड झाली आहे. या आयपीएलमध्ये पहिल्या 3 मॅचमध्ये ऋतुराज अपयशी ठरला होता. नंतरच्या तीन मॅचमध्ये मात्र त्यानं पुनरागमन करत जोरदार खेळ केला आहे. हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं फक्त 44 बॉलमध्ये 75 रन काढले. ऋतुराजनं फाफ ड्यू प्लेसिस (Faf du Plessis) सोबत पहिल्या विकेटसाठी 129 रनची पार्टनरशिप केली. या दोघांनी चेन्नईचा विजयाचा पाया रचला. त्यानंतर हैदराबादनं दिलेलं 172 रनचं आव्हान चेन्नईनं फक्त 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऋतुराजनं फाफ ड्यू प्लेसिस सोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जिंकल्यानंतर चेहऱ्यावर अतिरिक्त हास्य फुलतं असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलंय. ऋतुराजच्या या फोटोला मराठी अभिनेत्री सायली संजीवनं तिच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन रिप्लाय दिलाय. सायलीनं या फोटोवर लव्हची इमोजी टाकली आहे. सायलीची ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच व्हायरल (Viral) झाली आहे. ऋतुराजच्या फोटोवर सायली क्लीनबोल्ड झाली अशी चर्चा या निमित्तानं क्रिकेट फॅन्समध्ये सुरु झालीय. चेन्नई सुपर किंग्सची पुढील मॅच शनिवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध होणार आहे. आयपीएलच्या दोन बलाढ्य टीममधील या मॅचकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. मुंबई विरुद्धही ऋतुराजनं मोठा स्कोअर करावा अशी महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) अपेक्षा असेल. त्यामुळे सायलीची ही गोड प्रतिक्रिया ऋतुराजला मुंबई विरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरते का? हे शनिवारी रात्री स्पष्ट होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Instagram post, IPL 2021, Sayali Sanjeev, Viral photo

    पुढील बातम्या