विजयानंतर अंडर19 क्रिकेट टीमवर कौतुकांचा वर्षाव

या विजयानंतर दिग्गजांनी ट्विटरवर भारतीय टीमवर कौतुकांचा वर्षाव केला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2018 04:30 PM IST

विजयानंतर अंडर19 क्रिकेट टीमवर कौतुकांचा वर्षाव

03 फेब्रुवारी : अंडर19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत विश्वविजेता झाला.  8 गडी राखून  भारतानं ऑस्ट्रेलियाचा  पराभव केला. ऑस्ट्रेलियाचं 217 धावांचं आव्हान भारताने अवघ्या दोन विकेटमध्ये पेललं. या विजयानंतर दिग्गजांनी ट्विटरवर भारतीय टीमवर कौतुकांचा वर्षाव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय ट्विट करत म्हटलंय, 'यंग ब्रिगेडचा दणदणीत विजय. अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.'

Loading...

राहुल गांधींनी  ट्विट केलंय, 'अंडर 19 वर्ल्डकपचं जेतेपद पटकावल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. नव्या दमाच्या खेळाडूंनी मिळालेल्या यशाचा देशाला अभिमान आहे.'

तर देवेंद्र फडणवीस यांनीही  ट्विट करत अभिनंदन केलंय.'भारतीय संघाचं अभिनंदन ! चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्डकपचं जेतेपद ! संघाचं आणि द्रविडचं अभिनंदन.'

शरद पवारांनी ट्विट करत म्हटलंय, 'अंडर 19 वर्ल्डकपमधील दणदणीत जेतेपदाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.'

सचिन तेंडुलकरनंही अभिनंदन केलंय. तो म्हणतो,  'सांघिक कामगिरीच्या जोरावर मोठी स्वप्नंही पूर्ण होतात. विश्वविजेत्यांचं अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. राहुलचं खूप खूप अभिनंदन.'

किंग खाननंही टीमचं अभिनंदन केलंय.तो म्हणतो, 'यंग टीम इंडियासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. ज्युनियर्सनं जबरदस्त कामगिरी केली आहे. यापुढेही जग जिंकत राहा.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2018 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...