ICCमध्ये मोठे बदल, मनु साहनी यांच्यावर नवीन जबाबदारी

ICCमध्ये मोठे बदल, मनु साहनी यांच्यावर नवीन जबाबदारी

गेली सहा वर्ष डेव्हिड रिचर्डसन हे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. रिचर्डसन जुलैमध्ये होणाऱ्या विश्वचषकापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असतील.

  • Share this:

दुबई, 1 एप्रिल : ICCच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. यात मनु साहनी यांची ICCच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.दरम्यान याआधी गेली सहा वर्ष डेव्हिड रिचर्डसन हे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. रिचर्डसन जुलैमध्ये होणाऱ्या विश्वचषकापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असतील. त्यानंतर साहनी हा कार्यभार स्विकारतील. ICCने याबाबत अधिकृत घोषणा करत, साहनी सहा आठवडे रिचर्डसन यांच्यासोबत काम करत आहेत. त्यामुळे त्यांना या पदाचे गांभीर्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या लक्षात आल्या आहेत. तर, साहनी यांनी याबाबत, मला डेव्हिड यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी गेल्या सात वर्षात क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. मला आनंद आहे की, मला हा कार्यभार स्विकारता आला’’, असे मत व्यक्त केले.

साहनी हे भारतीय असून त्यांनी याआधी सिंगापूर स्पोर्टस हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सांभाळले आहे. तसेच गेली 17 वर्ष ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीचे संचालकही होते.


rong>VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या