ISSF वर्ल्ड कप : 0.1 पॉईंटनं गमावले पदक तरीही 'या' खेळाडूनं मिळवले ऑलिम्पिकचं तिकीट

ISSF वर्ल्ड कप : 0.1 पॉईंटनं गमावले पदक तरीही 'या' खेळाडूनं मिळवले ऑलिम्पिकचं तिकीट

याआधी राहीनं 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात जागतिक विक्रमासह सुवर्ण जिंकत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते.

  • Share this:

म्यूनिच, 29 मे : आयएसएसएफ वर्ल्ड कप 2019 मध्ये भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे, राही सरनोबतनंतर आता मनु भाकेरने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. म्युनिच येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतानं आपला दबदबा कायम ठेवला आहे. मनुनं 10 मीटर एअर रायफल प्रकारात आपलं स्थान पक्कं केलं आहे. मात्र या 17 वर्षीय नेमबाजी क्वीनचे पदक केवळ 0.1 गुणांनी हुकले आहे.

सध्या टोकयो येथे 2020ला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जोरात तयारी सुरु आहे. भारतीय खेळाडूही यासाठी मेहनत करत आहे. यात भारतीय नेमबाज आघाडीवर आहेत. 10 मीटर रायफल स्पर्धेत मनूनं 201.0 क्रमांकाची नोंद केली. त्यामुळं तिचे पदक हुकले.

तर, कोरियाच्या मिनजुंग किम हीने 201.1 गुणांची नोंद करत कांस्य पदक जिंकले. तर, ग्रीसच्या अना कोराराकीनं 241.4 गुणांसह सुवर्ण पदक जिंकले. मात्र मनुचे गुणसंख्या चांगली असल्यामुळं तिला ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले.

याआधी राहीनं 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात जागतिक विक्रमासह सुवर्ण जिंकले. तर, सौरभने फायनलला 246.3 गुण मिळवले. त्याने फेब्रुवारी दिल्लीत झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील स्वत:चा विक्रम मागे टाकला. त्याने यापूर्वीच ऑलिम्पिकचं तिकिट पटकावलं आहे. भारताच्या सौरभ चौधरीने प्रत्येक बाद फेरीत आघाडी कायम ठेवली. शेवटी दोनवेळा 10.3 तर एकदा 10.7 चे शॉट मारले. त्याने अंतिम शॉट 10.6 मारला. यामुळे त्याने स्वत:चा विक्रम मोडला. म्यूनिच वर्ल्ड कपमधील सौरभने पटकावलेलं दुसरं सुवर्ण होतं. त्याच्या आधी अपूर्वी चंडेलानं महिलांच्या 10 मीटक एअर रायफल स्पर्धेत सुवर्णवेध घेतला होता. दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात रशियाच्या आर्तम चेरसुनोवनं रौप्य आणि चीनच्या वेई पेंगनं कांस्य पदक जिंकलं.

वाचा-वर्ल्डकपआधी साऊथ आफ्रिकेला मोठा धक्का, 'हा' मुख्य खेळाडू स्पर्धेबाहेर

वाचा- आता हेच राहिलं होतं, धोनी झाला बांगलादेशचा कर्णधार!

वाचा-World Cup : केएल राहुलच्या एका शतकामुळं होणार 'या' तीन खेळाडूंचा पत्ता कट

वाचा-धोनीनं लावली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO व्हायरल

टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

First published: May 29, 2019, 7:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading