Home /News /sport /

...अन् मुलाखतीदरम्यान किवींच्या कर्णधाराने मनोज वाजपेयीला केले ट्रोल, VIDEO व्हायरल

...अन् मुलाखतीदरम्यान किवींच्या कर्णधाराने मनोज वाजपेयीला केले ट्रोल, VIDEO व्हायरल

kane williamson

kane williamson

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee ) याने किवींचा कर्णधार केन विल्यमसनची (kane williamson) व्हर्चुअली मुलाखत घेतली.

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर: बॉलिवूड (bollywood) आणि भारतीय क्रिकेटचं (Cricket) नातं सर्वश्रुत आहे. पण असेही परदेशी खेळाडू आहेत जे बॉलिवूडच्या प्रेमात पडले आहेत. दरम्यान, सध्या आणखी एका खेळाडूचे नाव नव्याने चर्चेत आले आहे, तो खेळाडू भारतीय वेब सीरिजच्या प्रेमात आहे. बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee ) याने किवींचा कर्णधार केन विल्यमसनची (kane williamson) व्हर्चुअली मुलाखत घेतली. ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अॅमेझॉन प्राइमने या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या मुलाखती दरम्यान वाजपेयीने अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये त्याने विल्यमसनला कोणती भारतीय वेब सीरिज आवडते असे विचारले. त्यावेळी नोजला त्याच्या 'द फॅमिली मॅन' शोबद्दल प्रशंसा ऐकण्याची अपेक्षा होती, परंतु केनने चतुराईने त्याला ट्रोल केले. केन विल्यमसनने प्रश्नाचे उत्तर दिले की, "ठीक आहे, मला वाटते की तुम्हाला माझा आवडता कार्यक्रम माहित आहे आणि मी पहिले दोन सीझन पाहिले आहेत. असे सांगत विल्यमसनने 'मला 'मिर्झापूर' ही वेबसीरिज खूप आवडत असल्याचे सांगितले. यापूर्वी दोघांनी क्रिकेट आणि मनोरंजनाबाबत अनेक गंमतीशीर संवाद साधला. न्यूझीलंड संघाने कोणती मोठी कामगिरी केली? या मनोज वाजपेयींच्या प्रश्नावर विल्यमसन म्हणाला, 'अलीकडेच आमच्या संघाने काही जागतिक स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत, पण आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकणे आमच्यासाठी सर्वात संस्मरणीय गोष्ट होती. यानंतर विल्यमसनने त्याच्या सहकारी खेळाडूंविषयी त्यांच्या क्रिकेटव्यतिरिक्त हटक्या गोष्टी सांगितल्या. ग्लेन फिलिप्स हा एक गुप्तहेर आहे, तर मिचेल सॅंटनर हा 9 ते 5 वाजेपर्यंत जॉब करणारा माणूस असल्याचे विल्यमसनने सांगितले. दरम्यान, अॅमेझॉन प्राइम इंडियाने नुकतीच घोषणा केली आहे की, 2022 च्या सुरुवातीपासून न्यूझीलंडमध्ये प्रसारित होणारे सामने अॅमेझॉन प्राइमवर लाइव्ह दाखविण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश या मालिकेपासून होईल. पुरुष संघासोबतच महिला संघांचे सामने देखील अॅमेझॉन प्राइमवर प्रसारित केले जातील. भारतीय महिला संघ आगामी विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. हा सामना देखील अॅमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    पुढील बातम्या