News18 Lokmat

IPL 2019 : सात वर्षांपूर्वीही अश्विननं केला होता असाच प्रताप, सचिननं दाखवली होती खिलाडूवृत्ती

हा असा प्रकार अश्विननं पहिल्यांदा केलेला नाही. असाच काहीसा प्रकार सात वर्षांपूर्वीही घडला होता. पाहा व्हिडीओ...

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 06:08 PM IST

IPL 2019 : सात वर्षांपूर्वीही अश्विननं केला होता असाच प्रताप, सचिननं दाखवली होती खिलाडूवृत्ती

जयपूर, 26 मार्च : आयपीएलच्या 12व्या हंगामाला सुरूवात होऊन तीन दिवसचं झाले असताना, एका नवीन वादाला सुरूवात झाली आहे. पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार आर अश्विननं जॉस बटलरला ज्या पद्धतीने बाद केलं, त्यावरून सोशल मीडियात टोकाच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचा कॅप्टन अश्विन याने राजस्थान रॉयल्सच्या बटलरला नॉन स्ट्रायकर्स एंडला स्टंप्स उडवून बाद केलं. हे क्रिकेटिंग स्पिरिटच्या विरुद्ध आहे, असं अश्विनच्या टीकाकारांनी म्हटलं आहे. मात्र हे अश्विननं पहिल्यांदा केलेले नाही. असाच काहीसा प्रकार सात वर्षांपूर्वीही घडला होता.



ब्रिस्बेन येथे झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका या एकदिवसीय सामन्यात अश्विननं लाहिरु थिरिमानेला माकंड नियमानुसार बाद केले होते. मात्र, त्यावेळी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि प्रभारी कर्णधार वीरेंद्र सेहवाग यांनी खिलाडूवृत्ती दाखवताना अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

दुसरीकडे जॉस बटलरबद्दलही काही पहिल्यांदा असा बाद झालेला नाही. 2014 श्रीलंकेच्या सचित्र सेनानायकेने एका एकदिवसीय सामन्यात बटलरला आधी ताकीद दिली होती. पण, तरिही तो क्रीझ सोडून पुढे गेला. त्यावेळी पंचांनी त्याला बाद घोषित केले होते.




मंकड आऊट म्हणजे काय?

40च्या दशकात भारताकडून खेळणारा सलामीवीर होता विनू मंकड. विनू मंकड डावखुरा स्लो बोलर म्हणूनही खेळत असे. भारताचा हा अष्टपैलू महान खेळाडू 1947-48 दरम्यान अशाच पद्धतीच्या वादात अडकला होता. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बोलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणए क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला.


सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...