भारताची दुसरी मेरी कोम! 19 व्या वर्षी पदार्पणातच वाजवला भारताचा डंका

भारताची दुसरी मेरी कोम! 19 व्या वर्षी पदार्पणातच वाजवला भारताचा डंका

ज्या राज्यात जन्म झाला त्यांनी संधी दिली नाही तेव्हा दुसऱ्या राज्यातून खेळली. यावेळी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचलेली ती भारताची एकमेव बॉक्सर होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मात्र, भारताची युवा बॉक्सर मंजू राणीने वेगळी ओळख निर्माण करत पदार्पणातच रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिनं वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतल्यानंतर तिनं थेट फायनलला धडक मारली. अंतिम सामन्यात मंजूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

मंजू राणीने लाइट फ्लायवेट (48 किलो) गटात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तिला पदार्पणातच सुवर्ण पदक पटकावण्याची संधी होती. मात्री, रशियाच्या एकातेरिना पाल्सेवानं मंजूला 4-1 ने पराभूत केलं. हरियाणाची असलेल्या मंजूला तिच्याच राज्यात संधी न मिळाल्यानं राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पंजाबचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती एकमेव भारतीय बॉक्सर ठरली.

येत्या शनिवारी मंजूचा वाढदिवस आहे. त्यापूर्वी मिळालेलं हे पदकं गिफ्टसारखंच आहे असं मंजूने पीटीआयशी बोलताना सांगितलं. रोहतकमधील रिठाल फोगाट या गावात राहणाऱ्या मंजूसाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याचा प्रवास मोठ्या संघर्षातून करावा लागला. सीमा सुरक्षा दलात अधिकारी म्हणून काम करणाऱ्या वडिलांचे 2010 मध्ये निधन झाले. त्यानंतर आई इशवंती देवीनं चार भावडांना सांभाळलं. फक्त 9 हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये घरखर्च आणि मुलांचं शिक्षण कऱणं ही तारेवरची कसरत होती.

बॉक्सर असलेल्या मंजूने तिची कारकिर्दी कबड्डीपट्टू म्हणून सुरू केली होती. तो सांघिक खेळ आहे पण मला वैयक्तिक खेळात उतरायचं होतं आणि बॉक्सिंग मला आवडलं. इथं विजयाचं श्रेय फक्त तुम्हाला मिळतं. माझ्या निर्णयाला आईने पूर्ण पाठिंबा दिला असंही मंजू म्हणाली.

भारताचा बॉक्सर विजेंदर सिंग आणि मेरीकॉम यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. मीसुद्धा त्यातील एक आहे. त्यांच्याकडे बघून प्रेरणा मिळते. त्यांचा खेळ बघायचे त्यामुळे बॉक्सिंगमध्ये करिअरचा निर्णय घेतला असंही ती म्हणाली.

खेळ शिकल्यानंतर संधीचा शोध घेत होते. हरियाणाकडून संधी मिळाली नाही तेव्हा दुसऱ्या राज्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला आणि स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. राज्याच्या संघात स्थान मिळाल्यानंतर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये स्थान पटकावलं आणि जानेवारीमध्ये भारतीय शिबिराचा भाग झाले असं मंजूने सांगितलं.

वाचा : थरूरांचं भारतीय क्रिकेटपटूवरचं ट्विट चर्चेत, नाराज झालेला श्रीसंत म्हणाला...

दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या