मुंबई, 02 डिसेंबर : भारतीय संघातील खेळाडू सध्य लग्न बंधनात अडकत आहे. यात क्लबमध्ये आता आणखी एका स्टार खेळाडूचा समावेश झाला आहे. आज भारताचा स्टार खेळाडू मनीष पांडे यानं दक्षिणात्य अभिनेत्रीशी विवाह केला. मनीष पांडेनं सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाचे नेतृत्वा करत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर लगेच मुंबईला येऊन अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत विवाह केला.
मनीष आणि आश्रिता यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आपल्या संघाचा चॅम्पियन केल्यानंतर मनीषचा आनंद आज द्विगुणीत झाला.
मनीष आणि आश्रिता एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाला काही मित्र आणि नातेवाईक उपस्थित असतील. दोन दिवस हा विवाहसोहळा चालणार आहे.
मनीषनं लग्नात क्रीम कलरची शेरवानी आणि चंदेरी रंगाचा फेटा घातला होता. तर, आश्रितानं लाल रंगाची साडी परिधान केली होती. लग्नाचे विधी दोन दिवस चालणार असून यावेळी टीम इडियाचे खेळाडूही उपस्थित राहू शकतात.
मुख्य म्हणजे लग्नानंतर मनीष पांडे हनीमूनला जाणार नाही आहे. याचे कारण आहे क्रिकेट. 6 डिसेंबरपासून भारत-वेस्ट इंडिज मालिकेला सुरुवात होणार आहे. यात मनीष पांडेला संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळं तीन टी-20 सामन्यात त्याची निवड झाल्यामुळे त्याला फिरायला जाता येणार नाही आहे.
आश्रिता शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंद्रजीत, ओरू कन्नियुम, उड्डयम, एनएच 4 यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. दुसरीकडे मनीषसाठी 2019 चांगला गेला आहे. कर्नाटकचे नेतृत्व करताना याआधी मनीषनं आपल्या संघाला विजय हजारे ट्रॉफीमध्ये विजेतपद मिळवले. तर लग्नाआधी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत संघाला विजय मिळवून दिला.