मनीष पांडेला ‘या’ सुंदर अभिनेत्रीनं केलं क्लिन बोल्ड, डिसेंबरमध्ये करणार लग्न!

मनीष पांडे आपल्या आयुष्यात एक वेगळी इनिंग सुरू करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 03:35 PM IST

मनीष पांडेला ‘या’ सुंदर अभिनेत्रीनं केलं क्लिन बोल्ड, डिसेंबरमध्ये करणार लग्न!

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. टी-20 स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेला मनीष पांडे भारतासाठी आगामी टी-20 वर्ल्ड कप खेळण्यास उत्सुक आहे. मात्र त्याआधी मनीष पांडे आपल्या आयुष्यात एक वेगळी इनिंग सुरू करणार आहे.

मनीष पांडे डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. मनीष पांडे गेल्या अनेक वर्षापासून सोबत असलेल्या आपल्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मनीष पांडेची होणारी बायको ही सुंदर अभिनेत्री आहे. 30 वर्षीय मनीष पांडे एका दक्षिणात्य अभिनेत्रीशी विवाहबंधनात अडकणार आहे. काही इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष पांडेच्य लग्नाची तारिखही ठरलेली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पांडे लग्नबंधनात अडकू शकतो. सध्या मनीष विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाकडून खेळत आहे. याआधी त्यानं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20 सामना खेळला होता.

अश्रिता शेट्टी होणार मनीषची बायको

आयपीएलमध्ये सगळ्यात आधी शतक करणारा मनीष पांडे 2 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. मनीषनं दक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी

Loading...

(Ashrita Shetty) विवाह करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मनीष आणि अश्रिता डेट करत होते. त्यामुळं आता घरच्यांच्या परवानगीनं हे दोघे विवाह करणार आहेत.

26 वर्षीय अश्रिता शेट्टीचे दक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठे नाव आहे. तिनं Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum आणि Udhayam NH4 अशा सिनेमांमध्या काम केले आहे. तसेच, R. Panneerselvamने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात अश्रिता काम करणार आहे.

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...