गेल्या 30 आठवड्यात भारत वगळता 6 संघांकडून खेळला ‘हा’ स्टार खेळाडू!

दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या टी-20 सामन्यानंतर 10 तासांत लगेच दुसऱ्या संघाकडून खेळला हा खेळाडू.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 06:47 PM IST

गेल्या 30 आठवड्यात भारत वगळता 6 संघांकडून खेळला ‘हा’ स्टार खेळाडू!

कर्नाटक, 24 सप्टेंबर : वर्ल्ड कपपासून भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत असल्यामुळं खेळाडू विश्रांती घेत आहेत. तर दुसरीकडे भारताचा स्टार युवा खेळाडू 30 आठवडे सतत इतर संघांकडून क्रिकेट खेळत आहे. प्रथम श्रेणी सामन्यांपासून, टीम इंडिया अ संघापर्यंत ते भारतीय संघाकडून या खेळाडूनं फलंदाजी केली आहे. एवढेच नाही तर एक सामना झाल्यानंतर 10 तासांत या खेळाडूनं दुसऱ्या संघासाठी खेळण्यास सुरुवात केली. हा खेळाडू आहे, भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि टीम इंडिया अ संघाचा कर्णधार मनिष पांडे.

क्रिकेटर मनिष पांडेला बऱ्याच कालावधीनंतर आपली शैली दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळं गेल्या 30 आठवड्यापासून 30 वर्षांचा मनिष पांडे सतत क्रिकेट खेळत आहे. मनिष पांडेने एका मागोमाग एक अशा बेलागांवी पॅंथर, वेस्ट इंडिजमध्ये टीम ए, बंगळुरू, मैसुर आणि तिरूअनंतपुरम आणि दक्षिण आफ्रिका विरोधात भारतीय संघ आशा संघाकडून सामना खेळला आहे. एवढेच नाही तर रविवारी दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20 सामना झाल्यानंतप सोमवारी लगेच पांडे कर्नाटक संघाकडून सरावासाठी रवाना झाला.

वाचा-‘धोनी एका दिवसात मोठा झाला नाही, मग पंतवर टीका का?’

मनिष पांडे विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटककडून खेळत आहे. याबाबत मनिष पांडेला विचारले असता, “मला क्रिकेट खेळायला आवडतं. मी नेहमी कर्नाटककडून खेळण्यास उत्सुक असतो. पुनरागमन करून आपल्या मित्रांसोबत खेळणे मला आवडतं”, असे सांगितले. आज कर्नाटक आणि हैदराबाद यांच्यात विजय हजारे करंडकमध्ये पहिला सामना झाला. त्यासाठी मनीष पांडे 10 तासांत रवाना झाला. गेल्या विजय हजारे करंडक हंगामात लीग स्टेजमध्ये बाहेर पडलेल्या कर्नाटक संघाला यंदा चांगली कामगिरी करण्याची संधी असेल.

वाचा-टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळं भारताचा हुकमी एक्का कसोटी संघातून बाहेर

Loading...

या खेळाडूंकडे असणार विशेष लक्ष

विजय हजारे करंडक स्पर्धेत पांडेसोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संघात स्थान न मिळालेला केएल राहुलही खेळणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये चांगली कामगिरी करता न आल्यामुळं केएल राहुलला दक्षिण आफ्रिका विरोधात संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळं केएल राहुलच्या खेळीकडे विशेष लक्ष असणार आहे. त्याशिवाय कर्नाटक संघात केव्ही सिद्धार्थ, देवदत्त पडिक्कल आणि अभिषेक रेड्डी यांच्यासारखे युवा खेळाडू आहेत.

वाचा-भारतीयांसाठी ऐतिहासिक आहे आजची तारीख, धोनीनं केली होती कमाल

VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 06:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...