दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारताचे दोन कर्णधार, 'या' खेळाडूंवर मोठी जबाबदारी!

दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारताचे दोन कर्णधार, 'या' खेळाडूंवर मोठी जबाबदारी!

दक्षिण आफ्रिका ए आणि भारतीय ए यांच्यात 29 ऑगस्टपासून पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, त्यानंतर सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, त्याआधी दक्षिण आफ्रिका एच्या विरोधात भारतीय ए संघ पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय संघानं दोन कर्णधारांची निवड केली आहे. या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात मनीष पांडे तर, चौथ्या आणि पाचव्या सामन्यात श्रेयस अय्यरकडे भारताचे नेतृत्व असणार आहे. ही मालिका 29 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

या मालिकेत युवा खेळाडू शुभमन गिल याला संधी देण्यात आली आहे. शुभमनबरोबरच विजय शंकर, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि नितीश राणा यांचाही समावेश असणार आहे.

किशन आणि सॅमसन असणार विकेटकिपर

झारखंडचा फलंदाज इशान किशन पहिल्या तीन सामन्यांसाठी विकेटकीपरची भुमिका बजावणार आहे. तर, चौथ्या आणि पाचव्या सामन्यात सॅमसनकडे किपरची जबाबदारी असणार आहे. तर, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल पहिल्या तीन सामन्यात खेळणार आहे.

वाचा-टीम इंडियाच्या बॅटिंग कोचसाठी ‘या’ दिग्गजांमध्ये शर्यत, कोण मारणार बाजी!

पहिल्या तीन सामन्यांसाठी असा आहे भारताचा संघ

मनीष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, इशान किशन (विकेटकीपर), विजय शंकर, शिवम दूबे, कृणाल पंड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शारदुल ठाकुर, दीपक चाहर, खलील अहमद, नितीश राणा.

वाचा-तब्बल 8 महिन्यांनंतर तळपली रहाणेची बॅट! पण धिमी फलंदाजी अडचणीची

चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), शुभमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिक्की भुई, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश राणा, विजय शंकर, शिवम दूबे, वॉश्टिंन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चाहर, शारदुल ठाकुर, तुषार देशपांडे, इशान पोरेल.

वाचा-शोएब मलीकनंतर पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू आज होणार भारताचा जावई!

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

Published by: Akshay Shitole
First published: August 20, 2019, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading