India A vs South Africa A : मनीष पांडेने केली कोहली-धोनीसारखी कमाल, टीम इंडियाने जिंकली मालिका!

India A vs South Africa A : मनीष पांडेने केली कोहली-धोनीसारखी कमाल, टीम इंडियाने जिंकली मालिका!

मनीष पांडेनं कर्णधारी खेळी करत 59 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 81 धावा केल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : भारताचा स्टार फलंदाज मनिष पांडेनं इंडिया एकडून खेळताना सोमवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात तुफानी फलंदाजी केली. मनीष पांडेनं कर्णधारी खेळी करत 59 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 81 धावा केल्या. यामुळं भारत अ संघानं 208 धावांचे लक्ष्य 27.5 ओव्हरमध्येच पूर्ण केले. हा भारतीय संघाची सलग तिसरा विजय आहे. आता मालिकेतील उर्वरित दोन सामने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळले जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था 26 धावांवर तीन विकेट अशी झाली होती. ऋतुराज गायकवाड (1), रिकी भुई (0) आणि कृणाल पांड्या (13) करत स्वस्तात बाद झाले. यानंतर कर्णधार मनिष पांडेनं इशांन किशनसोबत चांगली फलंदाजी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली. यानंतरही पांडेची बॅट थांबली नाही, संघाला विजय मिळवून देण्यासाठी मनिष पांडेनं दुप्पट मेहनत केली. मात्र, त्याला शतकी खेळी करता आली नाही 81 धावा करत बाद झाला. त्यानंतर शिवम दुबेनं 28 चेंडूत 45 धावा करत संघाला तिसरा विजय मिळवून दिला.

विराट आणि धोनीची केली बरोबरी

मनीष पांडेच्या नेतृत्वाखाली ज्यूनिअर भारतीय संघानं 27 सामन्यांपैकी 21 सामने जिंकले आहेत. यात 5 मालिकांचाही समावेश आहे. दरम्यान संघाच्या नेतृत्वात मनीष पांडेची फलंदाजीही तेवढीच चांगली असते. पांडेनं 27 सामन्यात 89.06च्या सरासरीनं 1425 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

वाचा-बुमराहच्या वेस्ट इंडिजमधल्या हॅट्ट्रिकचं इंग्लंड कनेक्शन!

वाचा-टीम इंडियाच्या जलद गोलंदाजाविरोधात अटक वॉरंट, विराटचे टेंशन वाढलं!

भारतीय संघाच्या टी-20 संघात मिळाली जागा

ज्युनिअर क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर मनीष पांडेनं आता सिनिअर संघात प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-20 संघात मनीष पांडेची निवड झाली होती. मात्र त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान आता दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या टी-20 संघात निवड झाली आहे.

वाचा-राहुलने लाज काढली, नेटीझन्स म्हणाले याच्यापेक्षा इशांत शर्मा बरा!

कोल्हापूरच्या राज घराण्यातील गणेश; न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या