मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'ऑलिम्पिक क्वालिफायर मॅच फिक्स करायला सांगितली', मणिकाचे कोचवर खळबळजनक आरोप

'ऑलिम्पिक क्वालिफायर मॅच फिक्स करायला सांगितली', मणिकाचे कोचवर खळबळजनक आरोप

भारताची टेबल टेनिस स्टार मणिका बात्राने (Manika Batra) राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय (Soumyadeep Roy) यांच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत.

भारताची टेबल टेनिस स्टार मणिका बात्राने (Manika Batra) राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय (Soumyadeep Roy) यांच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत.

भारताची टेबल टेनिस स्टार मणिका बात्राने (Manika Batra) राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय (Soumyadeep Roy) यांच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 3 सप्टेंबर : भारताची टेबल टेनिस स्टार मणिका बात्राने (Manika Batra) राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय (Soumyadeep Roy) यांच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत. मार्च महिन्यामध्ये ऑलिम्पिक क्वालिफायरच्या (Olympic Qualifier Match Fixing) मॅचमध्ये सौम्यदीप रॉय यांनी मला मॅच हारायला सांगितली, त्यामुळे मी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) मी त्यांची मदत घेतली नाही, असं मणिका म्हणाल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. टेबल टेनिस फेडरेशनने दिलेल्या कारणे दाखवा नोटिसला मणिकाने उत्तर दिलं, त्यात तिने हे खळबळजनक आरोप केले आहेत.

टेबल टेनिस फेडरेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॅच फिक्सिंग करायाल सांगितलेल्या व्यक्तीबरोबर पुन्हा खेळणं आपल्याला शक्य नव्हतं, असं मणिकाने तिच्या उत्तरात सांगितलं.

'मार्च 2021 साली डोहामध्ये झालेल्या क्वालिफिकेशन स्पर्धेत राष्ट्रीय प्रशिक्षकांनी माझ्यावर मॅच गमावण्यासाठी दबाव आणला. कारण प्रशिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्याला ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय करायचं होतं,' असं मणिका म्हणाली.

याबाबत रॉय यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला, पण ते उत्तर द्यायला उपलब्ध होऊ शकले नाहीत, असं टेबल टेनिस फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितलं. रॉय यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यामुळे त्यांना उत्तर द्यायला पुढे येऊदे, यानंतरच आम्ही भविष्यातल्या कारवाईचा निर्णय घेऊ, असं टेबल टेनिस फेडरेशनचं म्हणणं आहे.

रॉय हे कॉमनवेल्थमध्ये सूवर्ण पदक जिंकणारे खेळाडू आहेत. तसंच त्यांचा अर्जुन पुरस्काराने सन्मान झाला आहे. तर मणिकाला खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे. मणिका आणि सुतिर्था या दोघींनी रॉय यांच्या अॅकेडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि दोघी टोकयो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय झाल्या.

'या गोष्टीबद्दल मी टेबल टेनिस फेडरेशनला माहिती दिली. त्यांच्या दबावामुळे माझ्यावर मानसिक तणाव आला. ऑलिम्पिकमध्ये मला अशा प्रशिक्षकापासून लांब राहायचं होतं,' असं मणिका म्हणाली. ऑलिम्पिकमध्ये मणिका तिसऱ्या राऊंडपर्यंत तर सुतिर्था दुसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचली होती. ऑलिम्पिकमध्ये रॉय यांची मदत न घेतल्यामुळे मणिकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.

First published: