देशाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 2 खेळाडूंवर आली हायवेवर ऊसाचा रस विकण्याची वेळ

देशाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 2 खेळाडूंवर आली हायवेवर ऊसाचा रस विकण्याची वेळ

देशाला सुवर्ण पदक जिंकून देणारे खेळाडू पैशांसाठी हायवेवर विकत आहेत ऊसाचा रस.

  • Share this:

मंडी, 01 सप्टेंबर : कोरोनामुळे प्रत्येक व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तब्बल 6 महिन्यांनाही कोरोनामुळे भविष्य अंधुकच दिसत आहे. केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे. भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दोन खेळाडूंवर चक्क हायवेवर ऊसाचा रस विकण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय कुस्तीपटू अजय आणि राकेश यांना बेरोजगारीमुळे झगडत आहेत.

अजय पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळून तर राकेशनं तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळून राज्याचे प्रतिनिधीत्व केले. एवढेच नाही तर देशाचेही नाव या दोन खेळाडूंनी अनेक वेळा मोठे केले आहे. मात्र आता पैशांसाठी या दोघांना हायवेवर ऊसाचा रस विकून दोन वेळचं अन्न मिळवावं लागत आहे.

वाचा-भारतात परतल्यानंतर सुरैश रैनानं दिली प्रतिक्रिया

हायवेवर लावलं दुकान

आता हे दोघेही राष्ट्रीय महामार्ग -21 वर भसाचा रस विकत आहेत. दोन्ही खेळाडूंनी सांगितले की, आयटीआय डिप्लोमा करूनही या दोघांना सरकारकडून नोकरी मिळाली नाही. या समस्येबाबत दोन्ही खेळाडूंनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि कॅबिनेट मंत्री गोविंदसिंग ठाकूर यांच्याकडेही विनवणी केली होती, मात्र आजपर्यंत या दोन्ही खेळाडूंनी आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. कुस्ती व इतर खेळांना वीज विभागात समाविष्ट करण्याची मागणी राकेश व अजय कुमार यांनी केली आहे. मात्र तोपर्यंत दोन वेळच्या अन्नासाठी या खेळाडूंवर ऊसाचा रस विकण्याची वेळ आली आहे.

वाचा-अद्भुत वर्ल्ड रेकॉर्ड! फलंदाजानं एकाच दिवसात केली शतकी आणि अर्धशतकी खेळी

क्रीडामंत्र्यांनी दिलं मदत करण्याचे आश्वासन

हिमाचल प्रदेश सरकारचे क्रीडामंत्री राकेश पठाणिया म्हणाले की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. जर खेळाडू पात्र असतील तर त्यांना सरकारकडून सर्व शक्य मदत दिली जाईल. ते म्हणाले की, 3 टक्के कोटा मिळाल्याने आता क्रीडा मंत्रालय राज्यात एक नवीन क्रीडा धोरणही आणत आहे. या सर्व बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. राकेश पठाणिया म्हणाले की, भारत सरकार कडून मार्गदर्शकतत्त्वे येत आहेत आणि या संदर्भात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मदत करण्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 1, 2020, 3:48 PM IST
Tags: Wrestler

ताज्या बातम्या