Elec-widget

Para Badminton Championships : जिद्दीचं दुसरं नाव मानसी जोशी! हतबल होण्याआधी 'हे' व्हिडिओ एकदा पाहाच

Para Badminton Championships : जिद्दीचं दुसरं नाव मानसी जोशी! हतबल होण्याआधी 'हे' व्हिडिओ एकदा पाहाच

सर्व सामान्यांसारख आयुष्य जगणाऱ्या मानसीवर काळानं आघात केला, आणि एक रात्रीत तिचं आयुष्य बदलून गेलं.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : प्रत्येकाच्या आयुष्यात काही वाईट तर काही चांगले प्रसंग घडत असतात. या प्रसंगातून आपण आयुष्याकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो हे कळते. काही वेळा आपण गोष्टी प्रयत्न न करताच सोडून देतो, तर काही गोष्टी करताना आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा होते. यात स्वप्नांची जोड फार महत्तवाची आहे. मात्र, एक अशी खेळाडू जीनं वयाच्या 22व्या वर्षी स्वत:चे पाय गमावले, त्या खेळाडूनं सर्व गोष्टींवर मात करून फक्त आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला.

स्वित्झलॅंडमध्ये झालेल्या पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप 2019मध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. या खेळाची सोडाच मात्र खेळाडूंचीही कुठेही चर्चा झाली नाही. यात एक नाव आज जगाच्या पाठीवर उठून दिसत आहे, ते नाव आहे महाराष्ट्राच्या मानसी जोशी हिचं. सर्व सामान्यांसारख आयुष्य जगणाऱ्या या मुलीवर काळानं आघात केला, आणि एक रात्रीत तिचं आयुष्य बदलून गेलं. वयाच्या 22 वर्षी एका अपघातात तिला आपले पाय गमवावे लागले. जगण्याची उमेद नसताना, अचानक तिच्यात अशी काही ऊर्जा संचार झाली की तिनं सगळ्यात गोष्टींवर मात करत आपलं स्वप्न साकार करायचं एवढीच इच्छा मनाशी बाळगली.

 

Loading...

View this post on Instagram

 

आज का ज्ञान: करत करत अभ्यास के जड़मति होत सुजान Well i'm not jadmati, but still felt like posting this doha from class 5 that I always remember It is only through practice that I can skip a rope from 10 to 1000. #dontstop #Parabadminton #humfittohindiafit

A post shared by Manasi Nayana Joshi (@joshi.manasi) on

वाचा-Sorry मानसी! एका पायावर गोल्ड मिळवूनही आम्ही तुझी दखल घेण्यास कमी पडलो

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या मानसीनं आवड म्हणून बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. खर तर एका पायावर चालणंही अवघड असताना मानसी चक्क एका पायावर बॅडमिंटन खेळू लागली. तिचे हे व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावही शहारे येतील.

वाचा-आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ‘मिस्ट्री’ गोलंदाजानं घेतली निवृत्ती!

बॅडमिंटन ही फक्त आपली आवड नाही आहे, ही जिद्द आहे असे मानून तिनं हैदराबादला प्रसिध्द बॅडमिंटन कोच पी. गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. गोपीचंद यांनीही मोठ्या आनंदानं तिला प्रशिक्षण देण्यास होकार दिला. पण तिला ट्रेनिंग देणे सोपे नव्हते. एका पायावर एवढा कठिण खेळणे अशक्य वाटत होते, त्यासाठी खडतक ट्रेनिंग घेण्यास तिनं सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

And that's a clear case of skipping Sunday.

A post shared by Manasi Nayana Joshi (@joshi.manasi) on

अखेर मानसीनं 2014मध्ये पॅरा आशिया स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र या स्पर्धेत तिला यश आले नाही. त्याच वर्षीय मानसीनं पहिल्यांदाच रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतही तिनं सहभाग नोंदवला, मात्र या स्पर्धेतही तिला पाचव्या स्थानावर तिला समाधान मानावे लागले. त्यानंतर 25 ऑगस्टला झालेल्या विश्व पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत मानसीनं तीन वेळा विश्व चॅम्पियन झालेल्या पारुल परमारचा 21-12, 21-7नं पराभव केला. या पराभवाबरोबरच मानसीनं आपलं स्वप्न पूर्ण केलं. मात्र याच दिवशी सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले, त्यामुळं मानसीचा हा पराक्रम सारी जनता विसरून गेली. पण आज ट्रेंडमध्ये असलेल्या मानसीच्या या कहाणीनं सर्वांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

वाचा-सेहवागनं केली भविष्यवाणी, 'या' संघाला मिळणार कसोटी वर्ल्ड कप जिंकण्याचा मान!

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2019 08:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...