ममता बॅनर्जींनी काढला सौरव गांगुलीवर राग, म्हणाल्या...

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे.

  • Share this:
    कोलकाता, 15 मार्च : कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली. धर्मशाला येथे मुसळधार पावसामुळे तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआयने कोरोनाचा वाढता धोका पाहता, ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेचा दुसरा सामना आज लखनऊमध्ये तर तिसरा सामना 18 मार्च रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र ही मालिका रद्द केल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सामना रद्द करण्याबाबत सरकारला माहिती न दिल्याबद्दल गांगुलीवर नाराजी व्यक्त केली आहे. वाचा-IPL बाबत सौरव गांगुलीने केली मोठी घोषणा, कोरोनोच्या दहशतीचा असा होणार परिणाम पोलिसांनाही दिली नाही माहिती कोलकाताच्या इडन गाडनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जाणार होता. पण खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून बीसीसीआयने उर्वरित दोन एकदिवसीय सामने रद्द केले. मात्र सामना रद्द केल्यानंतर सरकारला याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याची तक्रार ममता बॅनर्जी यांनी केली आहे. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुली यांच्या निर्णयाच स्वागत आहे. मात्र त्यांनी याबाबत सरकारला किंवा निदान पोलिसांनी माहिती दिली पाहिजे होती, अशा शब्दात बीसीसीआय अध्यक्षांना फैलावर घेतले. वाचा-LIVE सामन्यात खेळाडूंचा अपमान मांजरेकरांना नडला, गांगुलीने केली हकालपट्टी कोरोनामुळे बीसीसीआय घाट्यात कोरोनाव्हायरसमुळे फक्त भारत-दक्षिण आफ्रिकाच नाही तर अनेक सामने रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आयपीएलचा तेरावा हंगामही पुढे ढकलण्यात आला आहे. 29 मार्चपासून सुरू होणार आयपीएलचा हंगाम आता 15 एप्रिलनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. तर, कोरोनाचा धोका वाढल्यास आयपीएल रद्दही होऊ शकते. असे झाल्यास बीसीसीआयला जवळजवळ 10 हजार कोटींचा फटका बसेल.
    First published: