आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात लाजीरवाणी कामगिरी, संपूर्ण संघ झाला अवघ्या 6 धावांवर बाद

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात लाजीरवाणी कामगिरी, संपूर्ण संघ झाला अवघ्या 6 धावांवर बाद

या संघातील 9 फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही.

  • Share this:

किगाली, 19 जून : जगभरात सध्या ICC Cricket World Cup 2019ची चर्चा आहे. एकीकडे क्रिकेटच्या विश्वात रोज नवनवीन विक्रम होत असतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की क्रिकेटच्या मैदानावर संपुर्ण संघ केवळ 6 धावांवर ऑल आऊट झाला तर? खोटं वाटेल पण असा प्रसंग खरचं घडला आहे. हा प्रसंग वर्ल्ड कपमध्ये घडला नसून, महिलांच्या टी-20 लीगमध्ये घडला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणताही संघानं केवळ 6 धावांवर बाद झालेला नाही. आंतरराष्ट्रीय महिला टी-20 क्रिकेट लीगमध्ये झालेल्या सामन्यात एकाही खेळाडूला भोपाळा फोडता आलेला नाही. हा सामना रवांडा येथील किगाली येथे झाला होता. हा सामना होता माली आणि रवांडा या दोन संघांविरोधात. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना माली संघाचे सर्व फलंदाज केवळ 6 धावांवर बाद झाले. यामुळं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड झाला आहे. याआधी याचवर्षी जानेवारीमध्ये झालेल्या एका सामन्यात चीनचा संघ केवळ 14 धावांत बाद झाला होता. मात्र आता सर्वात कमी धावसंख्येचा नवा रेकॉर्ड बनला आहे.

टी-20 सामन्यात माली संघ केवळ 9 ओव्हरमध्ये बाद झाला. आश्चर्याची बाब म्हणजे यातील 5 धावा एक्स्ट्रा असून केवळ 1 धावा करता आल्या. या संघातील 9 फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. माली संघानं दिलेल्या 6 धावांचा पाठलाग करताना रवांडा संघानं केवळ 4 चेंडूत हे आव्हान पूर्ण केले. रवांडा संघाकडून 19 वर्षीय जलद गोलंदाज जोसीन नायरनकुंदीनेजने एकही धाव न देता तीन विकेट घेतल्या. तर, मैरी डियाने आणि लेग स्पिनर मार्गेट वेमुलिया यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricketICC
First Published: Jun 19, 2019 02:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading