संघाची लाजीरवाणी कामगिरी! 10 फलंदाज शून्यावर बाद, प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर दाणादाण

संघाची लाजीरवाणी कामगिरी! 10 फलंदाज शून्यावर बाद, प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर दाणादाण

आता तर एक असा सामना झाला आहे की ज्यात गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या 10 फलंदाजांना खातंही उघडू दिलं नाही.

  • Share this:

काठमांडू, 08 डिसेंबर : क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ समजला जात असला तरी त्यात गोलंदाजही अनेकदा कमाल करतात. आता तर एक असा सामना झाला आहे की ज्यात गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या 10 फलंदाजांना खातंही उघडू दिलं नाही. मालदीवच्या संघाच्या नावावर हा नको असलेला विक्रम झाला आहे. दक्षिण आशियाई क़्रिडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात नेपाळ आणि मालदीव यांच्यात सामना झाला. यामध्ये मालदीवच्या 10 फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मालदीवने 11.3 षटके खेळून काढली पण यात फक्त 8 धावाच झाल्या. त्यातही फक्त एक धाव फलंदाजाने काढली. इतर धावा अवांतर होत्या. सलामीवीर आमिया एसाथ हिने 12 चेंडूत एक धाव काढली. याशिवाय इतर सर्व फलंदाजांनी शून्यावर समाधान मानले.

नेपाळकडून अंजली चंदने जबरदस्त कामगिरी केली. चारपैकी तीन षटके निर्धाव टाकत टाकली. यात तिने एक धाव देत चार फलंदाज बाद केले. त्यानंतर सीता राणा , रुबिना बेलबाशी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. नेपाळच्या संघाला 9 धावाच काढायच्या होत्या. त्यांच्या सलामीच्या जोडीने 7 चेंडूत सामना जिंकून दिला.

अंजली चंदच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 विकेट जमा झाल्या आहेत. यासाठी फक्त एकच धाव तिने दिली आहे. याआधी अंजलीने 6 फलंदाजांना बाद करताना एकही धाव दिली नव्हती.

दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया करणार रेकॉर्डब्रेक कामगिरी! रचले जाणार 6 विक्रम

गोलंदाजांची विश्वविक्रमी धुलाई! 40 षटकांत एकट्याने 585 धावा काढून रचला इतिहास

Published by: Manoj Khandekar
First published: December 8, 2019, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading