क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, अखेर धोनीच्या कमबॅकची तारीख ठरली

क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, अखेर धोनीच्या कमबॅकची तारीख ठरली

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅककडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Share this:

रांची, 25 ऑक्टोबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅककडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धोनीनं वर्ल्ड कप 2019मध्ये अखेरचा सामना खेळला होता, त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात धोनीची संघात निवड करण्यात आली नाही. दरम्यान, आता बांगलादेश विरोधात जाहीर करण्यात आलेल्या टी-20 संघातही धोनीच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चा असताना धोनीच्या कमबॅकची तारिख समोर आली आहे.

न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये महेंद्रसिंग धोनी प्रतिस्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या कसोटी सामन्यात रांची येथे धोनी उपस्थित होता. दरम्यान एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार धोनी सैयद मुश्ताफ अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. झारखंड संघाकडून कमबॅक करण्यासाठी धोनीनं ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. जानेवारी 2020मध्ये धोनी सैयद अली स्पर्धेत खेळण्यास सुरुवात करणार आहे. झारखंडच्या वरिष्ठ संघात धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यासाठी धोनी आतापासून राज्य अंडर-23 संघाकडून अभ्यास वर्गाला सुरुवात केली आहे.

वाचा-याला म्हणतात बर्थ डे गिफ्ट! वाढदिवसादिवशीच भारतीय गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी

निवड समितीनं दिले धोनीच्या निवृत्तीचे संकेत?

बांगालदेशविरुद्ध धोनी पुनरागमन करेल असं म्हटलं जात होतं पण असं झालं नाही. निवड समितीचे प्रमुख प्रसाद यांना याबाबत विचारण्यात आल्यानंतर त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं नाही. ते म्हणाले की, “वर्ल्ड कपनंतर स्पष्ट केलं होतं की आम्ही आता पुढचा विचार करत आहे. युवा खेळाडूंना संधी देत आहोत आणि ते स्वत:ला सिद्ध करू शकतील. सध्या पंत आणि संजू सॅमसन संघात आले आहेत. मला विश्वास आहे की तुम्ही आमचं म्हणणं समजून घेत असाल”. तसेच त्यांनी, “युवा खेळाडूंना संधी देण्याच्या निवड समितीच्या मताशी धोनीदेखील सहमत आहे. आमची धोनीशी चर्चा झाली असून त्यानंही निवड समितीचा हा निर्णय योग्य आहे”, असे सांगितले.

वाचा-कौतुकासाठी शब्द कमी पडत होते, अशा लाडक्या खेळाडूचा शास्त्रींनी केला पत्ता कट

निवृत्तीचा निर्णय धोनी घेणार

बांगलादेश दौऱ्यासाठी संघाची निवड करताना प्रसाद यांनी निवृत्तीचा निर्णय पूर्णपणे धोनीचा असेल असे म्हटले. आता त्याने घरेलू क्रिकेटमध्ये खेळून पुनरागमन करायचं की निवृत्ती घ्यायची याचा निर्णय हा सर्वस्वी त्याचा असेल. आम्ही आधीच त्याची कारकिर्द लांबवली आहे असंही सूचक वक्तव्य त्यांनी केले.

वाचा-धोनीची निवृत्ती नक्की? निवड समितीच्या प्रमुखांनी दिला सूचक इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Oct 25, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading