S M L

तिरंग्याची शान जपण्यासाठी धोनीने दाखवली चपळता, VIDEO VIRAL

तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना धोनीचा एका चाहता सुरक्षाकडे तोडून मैदानात आला.

Updated On: Feb 11, 2019 10:33 AM IST

तिरंग्याची शान जपण्यासाठी धोनीने दाखवली चपळता, VIDEO VIRAL

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: महेंद्रसिंग धोनी विकेटच्या मागे किती चपळ आहे हे सर्व जण पाहतातच. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात देखील याचा अनुभव आला. अशीच चपळता धोनीने देशाच्या ध्वजाची शान जपण्यासाठी देखील दाखवली आहे.

हे देखील वाचा:स्वप्नभंग! भारताच्या पराभवाने पाकिस्तानचा विक्रम अबाधित

तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना धोनीचा एका चाहता सुरक्षाकडे तोडून मैदानात आला. त्याने धोनीचे पाय पकडले. त्याचवेळी त्याच्या हातात भारताचा झेंडा देखील होता. पाया पडताना तिरंग्याचा स्पर्श जमीनीला झाला. हे लक्षात येताच धोनीने तातडीने चाहत्याकडून झेंडा काढून घेतला आणि तिरंग्याची शान जपली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्व नेटिझन्स धोनीचे कौतुक करत आहेत.

वाचा:'आऊट' फलंदाज पुन्हा मैदानात, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं

धोनीचा हा 300वा टी-20 सामना होता. टी-20मध्ये इतके सामने खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 175, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 96 आणि अन्य क्रिकेट स्पर्धांमध्ये काही सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये धोनीने 36.85च्या सरासरीने 1 हजार 558 धावा केल्या आहेत. यात दोन अर्ध शतकांचा देखील समावेश आहे. तर 56 कॅच आणि 34 स्टंपिग केल्या आहेत.

Loading...

भारताविरुद्धच्या अंतिम टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 212 धावा केल्या होत्या. पण भारताला विजयासाठी 4 धावा कमी पडल्या. यामुळे न्यूझीलंडने मालिका 2-1 अशी जिंकली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 09:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close