धोनीच्या चाहत्यांना अश्रु अनावर, ट्विटरवर व्हायरल होतोय 'हा' मेसेज

धोनीच्या चाहत्यांना अश्रु अनावर, ट्विटरवर व्हायरल होतोय 'हा' मेसेज

ट्विटरवर धोनीबाबत नवा ट्रेंड, चाहत्यांना अश्रु अनावर.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : महेंद्रसिंग धोनीनं इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर धोनीनं तीन महिने विश्रांती घेतली. वर्ल्ड कपनंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही धोनीला संघात जागा देण्यात आली नव्हती. एवढेच नाही तर बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेतही धोनी संघाचा हिस्सा नाही आहे.

दरम्यान गेले तीन-चार महिने क्रिकेटपासून दूर असणाऱ्या धोनीनं निवृत्ती घेतली की काय, अशा चर्चा चाहत्यांमध्ये सतत होत असतात. दरम्यान, अचानक #dhoniretires या हॅशटॅग ट्रेंडमुळे खळबळ माजली होती. मंगळवारी सकाळपर्यंत हा हॅशटॅग ट्रेंडवर होता. यामुळं चाहत्यांमध्ये संभ्रम होता. मात्र त्यानंतर काही क्रिकेट विश्लेषकांनी या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले.

धोनी सध्या आपल्या राहत्या घरी म्हणजेच रांचीमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात रांचीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हजर होता. यावेळी धोनीनं भारतीय क्रिकेट संघासोबत वेळ घालवला होता. त्यानंतर धोनीचे फिटनेस व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळं धोनी 2020मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये सामिल होईल असे वाटत असताना धोनीच्या निवृत्तीच्या अफवा व्हायरल झाल्या. त्यामुळं धोनीच्या चाहत्यांनी दु:ख झाले आहे.

धोनीच्य चाहत्यांना अश्रु अनावर

धोनीच्या निवृत्तीनंतर चाहत्यांनी क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, काही चाहत्यांनी वर्ल्ड कपपर्यंत थांबण्याची इच्छाही व्यक्त केली.

तर काहींनी महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर रडू अनावर झाल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2019 01:39 PM IST

ताज्या बातम्या