लष्करी गणवेशात धोनीची बॅटिंग; लेहमधील नागरिक म्हणाले माही मार रहा है!

लष्करी गणवेशात धोनीची बॅटिंग; लेहमधील नागरिक म्हणाले माही मार रहा है!

15 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर धोनी दिल्लीला परतला.

  • Share this:

लेह, 18 ऑगस्ट : विंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनं टेरिटोरियल आर्मीमध्ये प्रशिक्षण घेतलं. 15 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर धोनी दिल्लीला परतला. धोनी 30 जुलैपासून लेहमध्ये लष्करी प्रशिक्षण घेत होता. जम्मू- काश्मीरमधील पोस्टवर धोनीने एका सैनिकाचं आयुष्य जगत त्यांच्याप्रमाणेच देशसेवेत हातभार लावला. यादरम्यान सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटोही व्हायरल होत होते.

लष्करात काश्मीर खोऱ्यात धोनीनं प्रशिक्षत्ण घेतलं. स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला धोनी नवा केंद्रशासित प्रदेश लडाखला गेला होता. त्याठिकाणी आर्मी हॉस्पिटलमध्ये धोनीने रुग्णांची भेट घेतली. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर धोनी निवृत्त होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, धोनीने आपण विंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर लष्करासोबत काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतलं.

दरम्यान, सध्याच्या घडीला धोनीचा आणखी एक फोटो समोर आला आहे, यात तो बास्केटबॉल कोर्टमध्ये काही मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स या धोनीच्या आयपीएल संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही या क्षणाचा फोटो पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये कॅप्शनमध्ये धोनीचा उल्लेख 'थाला' म्हणूनही करण्यात आला. हा फोटो चाहत्यांमध्ये सध्या तुफान व्हायरल होत आहे.

वाचा-भारताच्या रनमशीननं मोडला सचिनचा आणखी एक ‘विराट’ रेकॉर्ड!

वाचा-भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या सासऱ्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

महेंद्रसिंग धोनीकडे क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011मध्ये धोनीला लेफ्टननं कर्नल हे मानद देण्यात आले होते. त्याचबरोबर धोनी क्वालिफाईड पॅराट्रूपरही आहे. याअंतर्गत धोनीने 2015 मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. दरम्यान धोनी सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात होत असलेल्या मालिकेत भारतीय संघासोबत सहभागी होऊ शकतो. तसेच, ही मालिका धोनीची शेवटची मालिकाही असू शकते, कारण दक्षिण आफ्रिकेचा संघा भारतात येणार आहे.

वाचा-कसोटी क्रिकेटचा रणसंग्राम! 'हे' 5 संघ आहेत ICC टेस्ट चॅम्पियनशीपचे प्रबळ दावेदार

तीन भारतीय ठरले पाकिस्तानला भारी, हा VIDEO पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 08:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading