BREAKING : टीम इंडियातून धोनी बाहेर

बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2018 11:34 PM IST

BREAKING : टीम इंडियातून धोनी बाहेर

26 आॅक्टोबर : महेंद्र सिंग धोनीच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी...वेस्ट इंडिज आणि आॅस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी-२० मालिकेतून महेंद्र सिंग धोनीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवशीय सामने सुरू आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्याच्या या मालिकेमध्ये धोनीला स्थान देण्यात आलं नाही.

धोनी पाठोपाठ कर्णधार विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मावर सोपवण्यात आली आहेत.

तसंच या मालिकेसाठी ऋषभ पंतने कमबॅक केलंय. दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पांड्या वाशिंग्टन सुंदर आणि शाबाज नदीम या खेळाडूंना संधी देण्यात आलीये.

अशी असेल टीम इंडिया (वेस्ट इंडिजविरूद्ध )

Loading...

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, वाशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव,भुवनेश्वर कुमार, जसप्रीत ब्रुमरा, खलील अहमद, उमेश यादव आणि शाबाज नदीम

आॅस्ट्रेलियाविरुद्ध २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली. याही मालिकेतही धोनीला जागा देण्यात आली नाही. आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्याची कमान विराट कोहली सांभाळणार आहे.

अशी असेल टीम इंडिया (एकदिवसीय)

विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत,कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वाशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत ब्रुमरा, खलील अहमद, आणि उमेश यादव

आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यासाठी टीममध्ये बदल करण्यात आले आहे. हार्दिक पांड्याला टीममधून वगळण्यात आलंय. तर पृथ्वी शॉ, पार्थिव पटेल, रोहित शर्मा, मुरली विजयला संधी देण्यात आली आहे.

आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, पृथ्वी शॉ, पुजारा, अजिंक्य रहाणे, हुनमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, आर.आश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, ईशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार.

=======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2018 11:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...