धोनी वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती?, आज होणार फैसला

धोनी वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती?, आज होणार फैसला

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध येत्या काही दिवसात यावर्षातील पहिला विदेशी दौरा करणार आहे. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला 24 जानेवारीपासून सुरुवात होईल. यात भारतीय संघ टी-20, वनडे आणि कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी आज न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा होणार आहे. त्यामुळे भारतीय संघात महेंद्र सिंग धोनीची निवड होणार की याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघात धोनीला जागा न मिळाल्यास धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त जाहीर करू शकतो. याआधी काही दिवसांपूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लवकरच धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत दिले होते.

वाचा-पांड्याला मोठा धक्का, न्यूझीलंड दौऱ्यातून 'या' कारणामुळे बाहेर

धोनीनेही दिले होते निवृत्तीचे संकेत

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. एवढेच नाही तर धोनीनं घरेलु मालिकांमध्येही भाग घेतला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार की नाही याबाबत शंक असताना, जानेवारीपर्यंत निवृत्तीबाबत विचारू नका, असे संकेत धोनीनं दिले होते.

‘वनडे क्रिकेटमधून धोनी घेऊ शकतो निवृत्ती’

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनी (महेंद्रसिंग धोनी) लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल असे संकेत दिले आहेत. या मुलाखतीत त रवी शास्त्री यांना धोनीच्या निवृत्तीबाबत विचारले असता, “धोनी बर्‍याच दिवसांपासून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत होता. त्यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि आता तो एकदिवसीय क्रिकेटदेखील सोडू शकतो. यानंतर या वयात त्याला फक्त टी -20 क्रिकेट खेळायला आवडेल. यासाठी त्यांना पुन्हा खेळायला सुरुवात करावी लागेल”, असे सांगितले.

वाचा-धोनी लवकरच वन-डे क्रिकेट मधून घेऊ शकतो संन्यास, रवी शास्त्रींचं मोठं विधान

टी -20 वर्ल्ड कप खेळणार धोनी!

रवी शास्त्री यांनी यावेळी धोनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतो असे संकेत दिले आहेत. जुलै 2019 पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसला तरी निवृत्तीबाबत थेट बोलला नाही आबे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियामधील त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. इंडियन प्रीमियर लीगमधील त्याचे खेळणे हादेखील वर्ल्ड कपच्या तयारीचा एक भाग मानला जात आहे. तथापि, त्याआधी धोनी न्यूझीलंड दौऱ्या साठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान मिळवू शकेल काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाचा-नववर्षात केएल राहुलचा दबदबा, रॅकिंगमध्ये कॅप्टन कोहलीला टाकले मागे

असा आहे भारताचा न्यूझीलंड दौरा

24 जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होईल. यात 5 टी-20, तीन एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी आज निवड समिती 15 ऐवजी 16 किंवा 17 खेळाडूंची निवड करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 12, 2020 10:53 AM IST

ताज्या बातम्या