क्रिकेटनंतर धोनीचं असंही देशप्रेम, 2 महिन्यांसाठी सियाचिनमध्ये होणार नियुक्ती?

धोनीला 2011मध्ये लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 03:55 PM IST

क्रिकेटनंतर धोनीचं असंही देशप्रेम, 2 महिन्यांसाठी सियाचिनमध्ये होणार नियुक्ती?

नवी दिल्ली, 18 जुलै : ICC Cricket World Cup 2019 सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला मिळालेल्या झटक्यातून चाहते सावरू शकलेले नाही. यात आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी माहिती देण्यात आली होती. दरम्यान वर्ल्ड कपमध्ये धोनीनं सुरुवातीचे काही सामने वगळता, चांगली फलंदाजी केली होती.

दरम्यान आता 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनी जाणार नसल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, कर्णधार विराट कोहली आणि बुमराह यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान आता, धोनी निवृत्ती जाहीर करणार नसल्यास तो दोन महिन्यांसाठी सियाचीनमध्ये भारतीय लष्कारासोबत जाऊ शकतो. धोनीला 2011मध्ये लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली होती.

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकणार

वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

वाचा- 'तो तर बेअक्कल फलंदाज', युवराज सिंगच्या वडिलांनी धोनीवर केले गंभीर आरोप

Loading...

सियाचीनमध्ये धोनी घेणार बदली

धोनीच्या जवळच्या मित्रांनी काही वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, धोनी निवृत्तीनंतर काय करणार हे निश्चित नाही आहे. त्यामुळं तो लष्करातही सामिल होऊ शकतो. त्यामुळं जर धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नसेल तर, तो सियाचीनमध्ये दोन महिन्यांसाठी बदली घेऊ शकतो.

वाचा- धोनीच्या निवृत्तीची Inside Story, आई-बाबा म्हणतात...

देवदूत मोटरमन; ...अन्यथा 500 फूट खोल दरीत कोसळली असती एक्स्प्रेस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...