सर्वात मोठी बातमी! कॅप्टन कूलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

सर्वात मोठी बातमी! कॅप्टन कूलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द घडवणारा एम. एस. धोनी (M S Dhoni retires)याने एक मोठी घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द घडवणारा एम. एस. धोनी (M S Dhoni retires)याने एक मोठी घोषणा केली आहे. T20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मधून यापूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली होती. आता आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि टी20 क्रिकेटलाही त्याने अल्विदा केलं आहे.

आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मधून यापूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली होती. आता आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि टी20 क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषक, T20 विश्वचषक आणि चँपियन्स ट्रॉफी या ICC च्या तीनही महत्त्वाच्या स्पर्धा धोनी कर्णधारपदी असताना भारताने जिंकल्या आहेत. त्यामुळे माहीला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जात होतं. कॅप्टन कूलने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची एक्झिट जाहीर केली आहे.  धोनी आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्त झाला असला, तरी IPL मध्ये मात्र तो दिसत राहणार आहे.

View this post on Instagram

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

निवृत्तीतही शायराना अंदाज

निवृत्तीची घोषणा करण्यासाठी धोनीने सोशल मीडियाला पसंत केलं. शायराना अंदाजात भावुक होत त्याने एक VIDEO शेअर केला आहे. 'मैं पल दो पल का शायर हूँ' असं म्हणत त्याने पूर्वीपासूनचे फोटोंचा कोलाज करत हा व्हिडीओ केला आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: August 15, 2020, 7:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या