VIDEO- धोनीएवढीच फिट आहे त्याची मुलगी

VIDEO- धोनीएवढीच फिट आहे त्याची मुलगी

धोनीच्या या ३ वर्षांच्या मुलीचा सध्या नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे

  • Share this:

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवा नेहमीच सोशल मीडिया प्रसिद्ध आहे. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला की काही मिनिटांतच तो व्हायरल होतो. धोनीच्या या ३ वर्षांच्या मुलीचा सध्या नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. धोनीची पत्नी साक्षीने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत झिवा प्लँक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना साक्षी म्हणाली की, ‘माझ्यापेक्षा काही सेकंद जास्त झिवाने प्लँक केलं. मी उठून बसून कॅमेऱ्या हातात घेऊन तिचा व्हिडिओ शूट करेपर्यंत ती प्लँक करत होती.’

 

View this post on Instagram

 

yes yes she managed to do few more seconds than me ... n until i could grab my phone n capture #firsttimeplank #mommyspartnerincrime 🔥 @zivasinghdhoni006 @mahi7781

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

प्लँक ही एक फिटनेस एक्सरसाइज आहे. यात पुश- अपच्या स्थितीत जास्तीत जास्त वेळ थांबून राहायचे असते. साक्षी आणि झिवा दोघींनी ही एक्सरसाइज एकत्र सुरू केली. मात्र झिवा तिच्यापेक्षा जास्त वेळ ही एक्सरसाइज करू शकली. सोशल मीडियावर झिवाच्या चाहत्यांमध्ये दिवसागणित वाढ होत आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यात अजून काही जणांची वाढ होईल हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 09:48 PM IST

ताज्या बातम्या