Home /News /sport /

कॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स! VIDEO VIRAL

कॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स! VIDEO VIRAL

VIDEO : क्रिकेटमधून विश्रांती घेतलेल्या धोनीचा साक्षीसोबत रोमान्स!

  नवी दिल्ली, 28 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप 2019पासून क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र सोशल मीडियावर धोनीचे हटके अंदाजातील व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच धोनीचा पत्नी साक्षीसोबत रोमॅंटिक डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अरमान मलिकने धोनी आणि साक्षीसाठी (Dhoni Sakshi) एक गाणे गायले. अरमानने धोनीच्याच सिनेमातले 'कौन तुझे यूं प्यार करेगा...' गाणे गायले आणि या गाण्यावर धोनी आणि साक्षी यांनी डान्सही केला. वाचा-माहीची ‘ती’ जागा अजूनही रिकामी! धोनीच्या आठवणीत भावुक झाला चहल
  वाचा-'केएल राहुलचं यष्टीरक्षण संघाला महागात पडणार, धोनीचं मौन समजण्यापलिकडे' अरमान मलिकने गाणे गात असताना धोनीला स्टेजवर बोलावले. स्टेजवर येताच धोनी पळून गेला. त्यानंतर साक्षी धोनीचा डान्स करण्यासाठी स्टेजवर घेऊन आली. धोनीच्या फॅन पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. धोनी आणि साक्षी स्टेजवर उभे राहून गाण्याचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. जाताना धोनीने मिठी मारून अरमानला शुभेच्छा दिल्या आणि स्टेजवरुन उतरला. वृत्तानुसार दिल्लीत हा कार्यक्रम झाला. वाचा-यष्टीरक्षक केएल राहुलने रचला इतिहास, धोनी-पंतला टाकलं मागे
  View this post on Instagram

  ❤️

  A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

  वाचा-...आणि श्रेयस अय्यर म्हणाला मराठीत सांगू का?, VIDEO VIRAL साक्षी धोनीने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात धोनी पाउट करताना दिसत आहे. त्याचा हा चाहत्यांच्या पसंतीस आला आहे. या कार्यक्रमात कपिल देवही आपल्या कुटूंबासमवेत उपस्थित होते.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Mahendra singh dhoni, Mahendra singh dhoni and sakshi

  पुढील बातम्या