वन डे क्रिकेटमधला 'महेंद्र' बाहुबली !

वन डे क्रिकेटमधला 'महेंद्र' बाहुबली !

तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवलाय.

  • Share this:

1 जुलै : तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवलाय. या विजयानं भारतानं 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0नं आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंग धोनीने ७९ बॉल्समध्ये ७८ धावांची विजयी खेळी करत मॅन ऑफ मॅचचा किताबही पटकावला. एवढंच नाहीतर या मॅच विनिंग खेळीच्या जोरावर धोनीनं धावांचा एका नवा रेकॉर्डही केलाय.

वनडेमध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्या विकेट किपरमध्ये धोनी आता दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचलाय. धोनीनं ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्टला मागे टाकलं आहे. वनडेमध्ये धोनीच्या आता ९४१४ रन्स आहेत तर गिलख्रिस्टनं वनडेमध्ये ९४१० रन्स बनवल्या आहेत. श्रीलंकेचा माजी विकेट किपर कुमार संगकारा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. संगकारानं १३,३४१ रन्स बनवल्या आहेत.

First published: July 1, 2017, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading