Home /News /sport /

मुंबई इंडियन्सच्या दिग्गजाला व्हायचं नाही टीम इंडियाचा कोच, BCCI ची ऑफर नाकारली!

मुंबई इंडियन्सच्या दिग्गजाला व्हायचं नाही टीम इंडियाचा कोच, BCCI ची ऑफर नाकारली!

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ 2021 टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपुष्टात येणार आहे, त्यामुळे बीसीसीआय (BCCI) टीम इंडियासाठी नव्या कोचच्या (Team India Head Coach) शोधात आहे.

    मुंबई, 18 सप्टेंबर : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ 2021 टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपुष्टात येणार आहे, त्यामुळे बीसीसीआय (BCCI) टीम इंडियासाठी नव्या कोचच्या (Team India Head Coach) शोधात आहे. भारतीय टीमचा कोच होण्यासाठी पुन्हा एकदा अनिल कुंबळेचं (Anil Kumble) नाव समोर आलं आहे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत कुंबळे टीम इंडियाचा कोच होता, पण विराटसोबत (Virat Kohli) वाद झाल्यामुळे कुंबळेने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुख्य प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची ऑफर दिली होती. जयवर्धनेने मात्र ही ऑफर नाकारली आहे. महेला जयवर्धनेला श्रीलंकेच्या क्रिकेट टीमचं प्रशिक्षक व्हायचं आहे, त्यामुळे त्याने बीसीसीआयची ऑफर स्वीकारण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच महेला जयवर्धने आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचा मुख्य कोच आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक दुसऱ्या कोणत्याही पदावर राहू शकत नाही, त्यामुळेही जयवर्धनेने टीम इंडियाचा कोच व्हायला नकार दिला असण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या महान खेळाडूपैकी एक असलेला महेला जयवर्धने जवळपास दोन दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये त्याने 149 टेस्ट आणि 448 वनडेमध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधीत्व केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये जयवर्धने याने 11,814 रन आणि वनडेमध्ये 12,650 रन केले. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्येही त्याने 55 मॅच खेळून 1,493 रन केले. जयवर्धनेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 54 शतकं आहेत, ज्यात 7 द्विशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 80 आयपीएल सामन्यांमध्ये 28.60 च्या सरासरीने 1,802 रन केले. आयपीएलमध्येही त्याच्या नावावर एक शतक आहे. 2015 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये जयवर्धने त्याची अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Ravi shastri, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या