Coca Cola ची बॉटल हटवून हिरो बनणाऱ्या रोनाल्डोची मुंबई इंडियन्सच्या दिग्गजाने केली पोलखोल

Coca Cola ची बॉटल हटवून हिरो बनणाऱ्या रोनाल्डोची मुंबई इंडियन्सच्या दिग्गजाने केली पोलखोल

युरो कपमध्ये (Euro Cup) कोका कोलाची (Coca Cola) बॉटल हटवून तिकडे पाण्याची बाटली ठेवल्यानंतर पोर्तगुालचा क्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) जगभरात चर्चेत आला.

  • Share this:

मुंबई, 18 जून : युरो कपमध्ये (Euro Cup) कोका कोलाची (Coca Cola) बॉटल हटवून तिकडे पाण्याची बाटली ठेवल्यानंतर पोर्तगुालचा क्रिस्टियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) जगभरात चर्चेत आला. रोनाल्डोच्या या कृतीमुळे कोका कोला कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. रोनाल्डोने कोका कोला पिऊ नका, तर पाणी प्या असा संदेश चाहत्यांना दिला. यानंतर जगभरात रोनाल्डोच्या या कृतीचं कौतुक करण्यात आलं, तर काहींनी इतर खेळाडूंना ट्रोल करायला सुरूवात केली.

खेळाडूंना ट्रोल करताना एका यूजरने श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आणि कुमार संगकारा (Kumar Sangakara) यांच्यावर निशाणा साधला. पण महेला जयवर्धने याने या ट्रोलरला प्रत्युत्तर देत रोनाल्डोचीही पोलखोल केली.

'क्रिस्टियानो रोनाल्डो आम्हाला तुझा अभिमान आहे. जयवर्धने आणि संगकारासारखे आमचे काही सेलिब्रिटी या सगळ्याला प्रोत्साहन देतात,' असं ट्रोलर म्हणाला. यानंतर जयवर्धनेने या ट्रोलरला प्रत्युत्तर देत रोनाल्डोचा एक जुना फोटो शेयर केला. या फोटोमध्ये तो कोका कोलाचा प्रचार करताना दिसत आहे.

'तुम्ही पुन्हा करून दाखवलंत. पुढच्यावेळी पॅराशूटशिवाय स्काय डाईव्ह करायला जा,' असं महेला जयवर्धने म्हणाला. जयवर्धनेच्या या ट्वीटच काही जणांनी समर्थन केलं, तर काहींनी टीका केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेला जयवर्धने आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक आहे.

Published by: Shreyas
First published: June 18, 2021, 7:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या