मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहित कॅप्टन झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या आणखी एकाला मिळाली मोठी जबाबदारी!

रोहित कॅप्टन झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या आणखी एकाला मिळाली मोठी जबाबदारी!

रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताच्या टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार झाल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) आणखी एका सहकाऱ्याला मोठी जबाबदारी मिळाली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 डिसेंबर : रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताच्या टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार झाल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) आणखी एका सहकाऱ्याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याची श्रीलंकेच्या सल्लागार प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटचे (Sri Lanka Cricket) सीईओ ऍशले डिसिल्वा यांनी ही माहिती दिली आहे. एका वर्षासाठी महेला जयवर्धनेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या राऊंडमध्ये महेलाने केलेली मदत श्रीलंकन टीमसाठी महत्त्वाची ठरली, असंही डिसिल्वा म्हणाले.

महेला जयवर्धने श्रीलंकन टीमचा सल्लागार प्रशिक्षक झाला असला तरी तो अंडर-19 टीमसोबत काम करणार आहे. पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, त्यासाठी तो खेळाडूंकडून तयारी करून घेणार आहे.

श्रीलंकन टीमचा सल्लागार प्रशिक्षक झाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया महेला जयवर्धनेने दिली आहे. 'खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत काम करायला मी उत्सुक आहे. देशात असलेल्या युवा खेळाडूंना योग्य न्याय द्यायचा प्रयत्न मी करेन. सगळ्यांचं सहकार्य आणि एकच लक्ष्य ठेवून काम केलं तर भविष्यात श्रीलंकेला यश मिळेल. माझी भूमिका प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफना घेऊन रणनिती आखण्याची असेल,' असं जयवर्धने म्हणाला.

महेला जयवर्धने प्रशिक्षक असताना मुंबई इंडियन्सने 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली. आता श्रीलंका क्रिकेटला पुन्हा एकदा जयवर्धनेकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंका क्रिकेटची कामगिरी ढासळली आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीमला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळाला नव्हता.

First published: