असं काय झालं की महात्मा गांधींच्या नावानं सुरू करावी लागली क्रिकेट मालिका!

असं काय झालं की महात्मा गांधींच्या नावानं सुरू करावी लागली क्रिकेट मालिका!

महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती देशभऱात साजरी केली जात आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 02 ऑक्टोबर : महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती देशभऱात साजरी केली जात आहे. त्याच्या अहिंसेच्या विचारांचे जगभरात आचरन केले जाते. गांधीजींच्या अहिंसेच्या विचारांचे आचरन त्यांचे आदर्श माननारे नेल्सन मंडेला यांनीसुध्दा केले. एवढेच नाही तर वकिलीच्या शिक्षणासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या गांधीचा एक पुतळा आजही प्रीटोरियात आहे. मात्र गांधीजी आणि क्रिकेट यांच्या विशेष काही संबंध नव्हता. असे असले तरी, 2015मध्ये बीसीसीआयच्या वतीनं गांधीजींच्या नावावर क्रिकेट मालिका सुरू करण्यात आली.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरू असलेली मालिका ही गांधी-मंडेला मालिका या नावानं ओळखली जाते. योगायोग म्हणजे आजच्या दिवशी गांधी जयंती साजरी केली जाते, आणि आजच्या दिवशी भारत-दक्षिण आफ्रिका मालिका सुरू झाली. पण तुम्हाला माहित आहे का, की या मालिकेला गांधी-मंडेला या नावानं का ओळखले जाते.

वाचा-महात्मा @ 150 : बापूंनी सांगितलेले 15 अनमोल आणि प्रेरणादायी विचार

या मालिकेला गांधी-मंडेला या नावाने ओळखला जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे, या दोन्ही दिग्गजांची विचारधारा. दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रपिता नेल्सन मंडेला आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विचारधारा समान आहे. दोघांनी शांती आणि अहिंसेच्या विचारांचे आचरन केले आहे. याच कारणामुळं आजही या दोघांची पूजा केली जाते.

कधी झाली मालिकेची सुरुवात

बीसीसीआयच्या आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड यांच्या वतीनं 2015मध्ये या मालिकेची घोषणा करण्यात आली. त्यामुळं या दोन्ही देशांची मालिका गांधी-मंडेला मालिका या नावानं ओळखली जाते. तर, विजेत्या संघाला देण्यात येणारी ट्रॉफी ही फ्रिडम ट्रॉफी या नावानं ओळखली जाते.

वाचा-SBI च्या लॉकरमध्ये होत्या गांधीजींच्या अस्थी, 46 वर्षांनी केलं विसर्जन

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट इतिहास

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 11 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. तर, 12वी मालिका ही 2 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 11 कसोटी मालिकेत 6 मालिका दक्षिण आफ्रिकेत झाल्या आहेत. तर, पाच भारतात. यात दक्षिण आफ्रिकेनं 6 तर भारतानं 2 मालिका जिंकल्या आहेत.

वाचा-गांधीजयंती : बापूंच्या मुलाला मुस्लीम मुलीशी करायचं होतं लग्न, पण...

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

First published: October 2, 2019, 12:29 PM IST

ताज्या बातम्या