मुंबई; 18 जानेवारी : महाराष्ट्रच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी "महाराष्ट्र केसरी" ही कुस्ती स्पर्धा काही दिवसांपूर्वीच पार पडली. या स्पर्धेत पुण्याचा शिवराज राक्षे हा विजेता ठरला असून त्याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्याचा मान मिळवला. परंतु यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सध्या वादात अडकली आहे. मातीतली कुस्तीच्या अंतिम सामन्यात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीत सिकंदरवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मातीतीली कुस्तीच्या अंतिम सामन्यातील स्पर्धक सिकंदर शेखवर याने देखील आपल्यावर पंचांकडून अन्याय झाल्याचे म्हंटले आहे. महाराष्ट्र्र केसरीच्या माती गटातील शेवटच्या सामन्यात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. या सामन्यात महेंद्र गायकवाड याला पंचांनी जादा गुण दिल्याचा आरोप केला जात आहे. या सामन्यात महेंद्र याने मारलेला टांग डाव बसला नसताना चार गुण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र केसरीच्या पंचांकडून सिकंदरवर कोणताही अन्याय केला नसल्याची कबुली देण्यात आली आहे. सध्या हा वाद कुस्ती विश्वात चर्चेचा विषय ठरला असून या वादाचा शेवट आता सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील कुस्तीच्या सामन्याने होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : रिषभ पंत वर्ल्ड कप पूर्वी होणार फिट? प्रकृती संदर्भात आली ही महत्वाची अपडेट
सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात सांगलीत कुस्ती होणार असल्याची माहिती मिळत आहे. ही कुस्ती घेण्यासाठी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे. या कुस्त्यांचे आयोजन काही दिवसातच सांगलीत होणार असल्याचे बोलले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Pune, Sports, Wrestler