कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टाची नोटीस; online gaming apps मुळे अडचणीत

कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टाची नोटीस; online gaming apps मुळे अडचणीत

online gaming apps ची जाहिरात करणं या सेलिब्रिटींना चांगलंच महागात पडणार आहे.

  • Share this:

मदुराई, 03 नोव्हेंबर : क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli), सौरव गांगुली (sourav ganguly), अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati ) अडचणीत सापडले आहे. ऑनलाइन गेमिंग अॅपची (online gaming apps) जाहिरात केल्यामुळे या सेलिब्रिटींना कोर्टानं नोटीस बजावली आहे. मद्रास हायकोर्टानं याप्रकरणी सेलिब्रिटींकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.

गँबलिंग अॅपला प्रोत्साहन दिल्याविरोधात मद्रास हायकोर्टात (madras high court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सेलिब्रिटींनी ऑनलाइन गँबलिंगला (gambling) प्रमोट केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटर विराट कोहली, सौरव गांगुली, अभिनेता प्रकाश राज, तमन्ना भाटिया आणि राणा दग्गुबाती यांचा समावेश आहे.

द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार या याचिकेवर आज मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठात ही सुनावणी झाली. मदुराई कोर्टानं सेलिब्रिटींना नोटीस बजावली आहे.

हे वाचा - SSR case : सुशांत का गेला डिप्रेशनमध्ये? मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा

हे ऑनलाइन अॅप जुगाराला प्रोत्साहन देतं. gambling games मुळे लोकांसमोर चुकीचा संदेश जातो, हे अॅप लोकांच्या भावनांशी खेळतं लोकांवर गँबलिंग अॅपचा आणि सेलिब्रिटींचा प्रभाव पडतो हे माहिती असताना त्यांनी अशा अॅपचं प्रमोशन का केलं अशी विचारणा कोर्टानं या सुनावणीवेळी केली. सेलिब्रिटींशिवाय कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारलादेखील या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. आता 19 नोव्हेंबरला  या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

हे वाचा - जावेद अख्तर कंगनाविरोधात कोर्टात, वाचा नेमकं काय आहे प्रकरण..!

दरम्यान मद्रास हायकोर्टातच कोहली आणि तमन्नाविरोधात याच प्रकरणावरून आणखी एक याचिका दाखल  करण्यात आली आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटी तरुणांना online gambling कडे आकर्षित होण्यास भाग पाडत आहे. online gambling करणं आणि त्यासाठी प्रोत्साहित करणंही गुन्हाच आहे. त्यामुळे  दोघांनाही अटक करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

Published by: Priya Lad
First published: November 3, 2020, 9:24 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या