विराट आऊट झाला म्हणून चाहत्याने घेतले पेटवून !

विराट आऊट झाला म्हणून चाहत्याने घेतले पेटवून !

बाबूलाल बैरवा शुक्रवार रात्री भारत-दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना टीव्हीवर पाहत होता. विराट कोहलीने फक्त 5 धावा केल्या आणि बाद झाला.

  • Share this:

08 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहली लवकर बाद झाल्यामुळे मध्य प्रदेशच्या रतलाम भागातील एका चाहत्याने पेटवून घेण्याची धक्कादायक घटना घडलीये. बाबूलाल बैरवा असं या चाहत्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर नगर भागात राहणारा बाबूलाल बैरवा शुक्रवार रात्री भारत-दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना टीव्हीवर पाहत होता. विराट कोहलीने फक्त 5 धावा केल्या आणि बाद झाला. कोहली 5 धावांवर बाद झाल्यामुळे बाबूलाल बैरवा इतका दुःखी झाला की त्याने स्वतःवर केरोसिन ओतून पेटवून घेतलं. त्याचा आरडाओरडा ऐकल्यानंतर पत्नी आणि शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या डोके, चेहरा हात  आणि काही भाग आगीत होरपळला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलंय. विराट बाद झाल्यामुळे मी स्वत:ला जाळून घेतल्याची कबुली त्याने दिलीये.

First published: January 8, 2018, 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading