सचिनला क्रिकेटचा देव करण्यामागे माधव आपटेंचा हात, जाणून घ्या UNTOLD STORY

सचिनला क्रिकेटचा देव करण्यामागे माधव आपटेंचा हात, जाणून घ्या UNTOLD STORY

भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : भारताचे माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांचं सोमवारी निधन झालं. त्यांनी भारतासाठी फक्त 7 कसोटी खेळल्या असल्या तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी खर्ची घातलं होतं. ते वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होते. एवढंच नाही तर युवा क्रिकेटपटूंसाठी त्यांनी काही नियमांमध्येही बदल केले. माधव आपटे यानी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे नियम बदलून सचिनला क्लबमध्ये आणलं होतं. त्यावेळी सचिनचं वय 14 वर्ष इतकं होतं.

माधव आपटे यांची क्रिकेट कारकिर्द अनेक कारणांनी गाजली आहे. कॉलेजमध्ये विनू मांकड यांच्यासोबत त्यांनी सलामीला फलंदाजी केली. त्यानंतर विजय मर्चंट यांच्या दुखापतीमुळे मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

एक गोलंदाज म्हणून क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात कऱणाऱ्या माधव आपटेंनी वीनू मांकड यांच्या सांगण्यावरून सलामीला फलंदाजी केली होती. त्यानंतर मुंबईत विजय मर्चंट यांच्यासोबत सराव केला. 1951 मध्ये रणजी ट्रॉफीत मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यात सामना होणार होता. तेव्हा सलामीवीर विजय मर्चंट दुखापत झाल्यानं बाहेर पडले. त्यांच्या जागी माधव आपटेंना संधी मिळाली. त्याचा फायदा घेत माधव आपटेंनी पदार्पणातच शतक झळकावलं होतं.

प्रथम श्रेणी क्रिकेमधून निवृत्त झाल्यानंतर मुंबईत कंगा लीगसाठी खेळणं सुरू ठेवलं. 70 वर्षांपर्यत ते खेळत राहीले. जॉली क्रिकेटर्सचं प्रतिनिधीत्व करताना त्यांनी 50 हंगाम खेळले. त्यांनी शेवटचा सामना वयाच्या 70 व्या वर्षी खेळला.

1989 मध्ये देशातील सर्वात जुना क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी माधव आपटे होते. तेव्हा सचिनच्या कारकिर्दीला घडवण्यात त्यांचा मोलाचा हातभार लागला आहे. त्यांनी सचिन तेंडुलकरला क्लबमध्ये घेण्यासाठी सीसीआयच्या नियमांमध्ये बदल केला. त्यामुळेच वयाच्या 14 व्या वर्षी सचिनचा क्लबमध्ये संधी मिळाली आणि पुढचा मार्ग मोकळा झाला.

VIDEO: फोटो काढणाऱ्यांना दाखवला 'Attitude', ढिम्मासारखा पाहात राहिला बिबट्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 23, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या